'सरकारने जखमेवर मीठ चोळले', काँग्रेसने पीएम मोदींचा 'तो' व्हिडिओ शेअर करत साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 21:20 IST2025-04-07T21:19:30+5:302025-04-07T21:20:00+5:30

Congress Attack On PM Modi: केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क अन् एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत वाढवल्याने काँग्रेसचा हल्लाबोल.

Congress Attack On PM Modi: 'The government rubbed salt in the wound...', Congress targeted PM Modi by sharing 'that' video | 'सरकारने जखमेवर मीठ चोळले', काँग्रेसने पीएम मोदींचा 'तो' व्हिडिओ शेअर करत साधला निशाणा

'सरकारने जखमेवर मीठ चोळले', काँग्रेसने पीएम मोदींचा 'तो' व्हिडिओ शेअर करत साधला निशाणा

Congress Attack On PM Modi: केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांची तर एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या वाढीनंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने पंतप्रधान मोदींना महागाईचा माणूस म्हटले. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तर पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करत तुमच्या सरकारने जखमेवर मीठ चोळल्याची टीका केली.

एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीवर खरगे काय म्हणाले?
एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीवर खरगे म्हणाले, आता फक्त एलपीजी गॅस सिलिंडरच बाकी होते मोदीजी...आता तर महागाईने 'उज्ज्वला'च्या गरीब महिलांची बचतही जाणार. लूटमार, खंडणी, फसवणूक... हे सगळे मोदी सरकारचे पर्याय बनले आहेत, अशी घणाघाती टीका खरगेंनी केली.

आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये खरगे म्हणतात, वाह मोदीजी वाह!! मे 2014 च्या तुलनेत आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत 41% घसरण झाली आहे, परंतु पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याऐवजी तुमच्या सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्कात ₹2-₹2 ने वाढ केली आहे. टॅरिफ पॉलिसीच्या कुंभकर्णी झोपेतून तुम्हाला कदाचित शांतता मिळाली नसेल, ज्यामुळे शेअर बाजारातील मोठ्या आणि छोट्या गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी रुपयांचे नुकसान एकाच वेळी झाले, म्हणूनच तुमचे सरकार जखमेवर मीठ चोळायला आले आहे, असेही खरगे म्हणाले.

काँग्रेसने पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे
काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया हँडल X ने पीएम मोदींचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मोदी यूपीए सरकारच्या काळात एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवल्याचा निषेध करताना दिसत आहेत. 
 

Web Title: Congress Attack On PM Modi: 'The government rubbed salt in the wound...', Congress targeted PM Modi by sharing 'that' video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.