काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली! कमलनाथ छिंदवाडामधून तर बघेल पाटणमधून निवडणूक लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 10:15 AM2023-10-15T10:15:30+5:302023-10-15T10:17:56+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Congress announced the first list of candidates! Kamal Nath will contest from Chhindwara while Baghel will contest from Patan | काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली! कमलनाथ छिंदवाडामधून तर बघेल पाटणमधून निवडणूक लढवणार

काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली! कमलनाथ छिंदवाडामधून तर बघेल पाटणमधून निवडणूक लढवणार

येत्या काही दिवसात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेशच्याही निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत मध्य प्रदेशातील १४४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर छत्तीसगडसाठी ३० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यादीनुसार माजी मुख्यमंत्री कमलनाथ छिंदवाडामधून तर भूपेश बघेल पाटणमधून निवडणूक लढवणार आहेत. मध्य प्रदेशात दिग्विजय सिंह यांचा मुलगा जयवर्धन सिंह यांना राघोगडमधून, तर दिग्विजय सिंह यांचे भाऊ लक्ष्मण सिंह यांना चचौरा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसने चुरहटमधून अर्जुन सिंह यांचा मुलगा अजय सिंह राहुल यांना तिकीट दिले आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; टेम्पो ट्रॅव्हलर ट्रकवर आदळली, 12 जणांचा मृत्यू

राऊळमधून माजी खासदार मंत्री जितू पटवारी यांना तिकीट देण्यात आले आहे. आगर माळवामधून विपन वानखेडे आणि सुसनेरमधून भेरू सिंग परिहार बापू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यादीनुसार उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव यांना छत्तीसगडमधील अंबिकापूरमधून तिकीट देण्यात आले आहे. दीपक बैज यांना चित्रकोटमधून तिकीट देण्यात आले आहे.

काँग्रेसने हातपिपल्यातून राजवीर सिंह बघेल यांना तिकीट दिले आहे, तर भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले दीपक जोशी या जागेवरून निवडणूक लढवत होते. दीपक जोशी हे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे पुत्र आहेत. हातपिपल्यातून मनोज चौधरी यांच्याकडे लक्ष वेधल्यामुळे संतप्त होऊन ते पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले, मात्र १४४ उमेदवारांमध्ये त्यांचे नाव नाही.

Web Title: Congress announced the first list of candidates! Kamal Nath will contest from Chhindwara while Baghel will contest from Patan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.