शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

सरस्वती वंदनेच्या आदेशावरून गुजरातमध्ये वादंग हिंदुत्वाचा अजेंडा राबविल्याचा काँग्रेसचा आरोप

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

अहमदाबाद- वसंत पंचमीनिमित्त सर्व शाळांनी मुलांकडून सरस्वती वंदना करवून घ्यावी, अशा आशयाची एक नोटीस अहमदाबाद शाळा मंडळाने काढली असून त्यामुळे अहमदाबादेत वादंग निर्माण झाले आहे. भाजपा हिंदुत्वाच्या अजेंड्याला राबवित असल्याचा आरोप करून काँग्रेसने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

अहमदाबाद- वसंत पंचमीनिमित्त सर्व शाळांनी मुलांकडून सरस्वती वंदना करवून घ्यावी, अशा आशयाची एक नोटीस अहमदाबाद शाळा मंडळाने काढली असून त्यामुळे अहमदाबादेत वादंग निर्माण झाले आहे. भाजपा हिंदुत्वाच्या अजेंड्याला राबवित असल्याचा आरोप करून काँग्रेसने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
मंडळाने १९ जानेवारी काढलेल्या या नोटिसीत, वसंत पंचमीनिमित्त विद्येची देवी सरस्वतीची पूजा आयोजित करण्याची आवश्यकता असून शालेय प्रार्थनेदरम्यान विद्यार्थ्यांकडून सरस्वती वंदना करवून घ्यावी तसेच त्यांना अन्य राज्यांमध्ये वसंत पंचमी कशी साजरी केली जाते याची माहिती द्यावी, असे म्हटले आहे.
अहमदाबाद महानगरपालिकेच्या शाळा मंडळाच्या शहरात सुमारे ४५० प्राथमिक शाळा आहेत. ज्यात ६४ शाळा या उर्दू माध्यमाच्या असून त्या मुस्लीमबहुल भागात आहेत. या शाळांमध्ये अल्पसंख्य समाजातील सुमारे १६ हजार विद्यार्थी शकत आहेत.
या नव्या सूचनेवर काँग्रेसने हरकत घेतली असून यामुळे मुस्लीमांच्या मूलभूत अधिकारांवर हल्ला होत असल्याचे म्हटले आहे. इस्लाममध्ये कुठल्याही प्रकारची मूर्ती पूजा वर्ज्य आहे.
सरखेज वॉर्डाचे काँग्रेसचे नगरसेवक हाजी मिर्जा बेग यांनी हा भाजपाचा हिंदुत्ववादी अजेंड्याला प्रोत्साहन देण्याचा भाग असल्याचे म्हटले आहे. लोकशाहीत प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला त्याच्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे. ही सूचना फक्त मुस्लीम बांधवांच्या स्वातंत्र्यावरील हल्ला नसून ती दुसऱ्या धर्मांच्या स्वातंत्र्यावरही घाला असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे. ही सूचना उर्दू शाळांमध्ये आवश्यक करू नये. या तानाशाही वर्तनाचा निषेध केला जाईल अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यांनी पुढे स्पष्ट केले आहे.