शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

शबरीमला मंदिर प्रकरणी केरळ सरकारने घेतलेली भूमिका लाजिरवाणी, नरेंद्र मोदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 8:41 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबरीमला प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच केरळमधील डाव्या पक्षांच्या सरकारने महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत घेतलेल्या भूमिकेवरही मोदींनी ताशेरे ओढले.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबरीमला प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे शबरीमाला प्रकरणी भारतीय जनता पक्ष संस्कृतीसोबत शबरीमलाप्रकरणी केरळ सरकारने घेतलेली भूमिका इतिहासात सर्वात लाजिरवाणी

कोलम (केरळ) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबरीमला प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केरळमधील कोलम येथे प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी शबरीमाला प्रकरणी भारतीय जनता पक्ष संस्कृतीसोबत आहे, असे सांगितले. तसेच केरळमधील डाव्या पक्षांच्या सरकारने महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत घेतलेल्या भूमिकेवरही मोदींनी ताशेरे ओढले. याप्रकरणी केरळ सरकारने घेतलेली भूमिका इतिहासात सर्वात लाजिरवाणी होती, अशी टीका मोदींनी केली. मोदी म्हणाले, ''संपूर्ण देश गेल्या काही काळापासून शबरीमला मंदिराची चर्चा करत आहे.  शबरीमला प्रकरण हाताळताना केरळमधील सत्ताधारी एलडीएफ सरकारने  केलेले इतिहासात सर्वात लाजिरवाणे म्हणून ओळखले जाईल. डावी मंडळी भारतीय इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकता यांचा सन्मान करत नाही हे आम्हाला माहीत होते. मात्र याविषयी त्यांच्या मनात एवढा द्वेश असेल असे वाटले नव्हते.'' 

 यावेळी मोदींनी शबरीमला प्रकरणात आपल्या पक्षाचीही भूमिका स्पष्ट केली. ''केरळ आणि केरळमधील संस्कृतीच्या रक्षणासाठी जर कुठला पक्ष उभा असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. शबरीमला प्रकरणी आमच्या पक्षाची भूमिक नेहमीच स्पष्ट राहिली आहे. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडी हीसुद्धा एलडीएफपेक्षा वेगळी नाही. काँग्रेसवाले शबरीमला प्रकरणी राज्यामध्ये वेगळे बोलतात. तर संसदेत काही वेगळेच बोलतात. मात्र आता त्यांची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे." असे मोदींनी सांगितले. तसेच यूडीएफ आणि एलडीएफ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका मोदींनी केली. दोन्ही आघाड्यांची नावे वेगळी असली तरी भ्रष्टाचार, जातीवाद आणि सांप्रदायिकतेबाबत त्यांची भूमिका एकच आहे, असेही मोदींनी सांगितले. 

 

टॅग्स :Sabarimala Templeशबरीमला मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीKeralaकेरळBJPभाजपा