शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

गांधी कुटुंबियांच्या ट्रस्टच्या चौकशीसाठी नेमली समिती, विविध तपास यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 6:19 AM

या तीन ट्रस्टनी प्राप्तिकर कायदा, मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा व परकीय देणग्या नियमन कायदा या कायद्यांच्या केलेल्या कथित उल्लंघनांच्या प्रकरणांच्या तपासात ही समिती समन्वय ठेवेल.

नवी दिल्ली : राजीव गांधी फौंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या गाधी कुटुंबाशी संबंधित तीन संस्थांनी देणग्या व आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत अनेक कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या कथित प्रकरणांच्या तपासात समन्वय साधण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी एक आंतर मंत्रालयीन समिती स्थापन केली.अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) विशेष संचालकांच्या अध्यक्षतेखालील या समितीत या संचालनालयाखेरीज प्राप्तिकर विभाग व केंद्रीय गृह मंत्रालयाचेही अधिकारी असतील. या तीन ट्रस्टनी प्राप्तिकर कायदा, मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा व परकीय देणग्या नियमन कायदा या कायद्यांच्या केलेल्या कथित उल्लंघनांच्या प्रकरणांच्या तपासात ही समिती समन्वय ठेवेल.‘संपुआ’ सरकारच्या काळात पं्रतप्रधान राष्ट्रीय मदत निधीचा पैसा राजीव गांधी फौंडेशनकडे बेकायदा वळविण्यात आला, असा आरोप करणारे टष्ट्वीट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केल्यानंतर लगेच सरकारी पातळीवर हा निर्णय होणे लक्षणीय आहे. २६ जूनच्या टष्ट्वीटमध्ये नड्डा यांनी लिहिले होते: गरजू आणि अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी असलेला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीचा पैसा ‘संपुआ’ सरकारच्या काळात राजीव गांधी फौंडेशनला दिला जात होता. तो पैसा एका कुटुंबातर्फे चालविल्या जाणाऱ्या संस्थेकडे वळविणे हा धडधडीत घोटाळाच नाही तर देशातील लोकांचा घोर विश्वासघात आहे.काँग्रेसच्या या सरंजामी घराण्याने देशाची त्याबद्दल माफी मागायला हवी. राजीव गांधी फौंडेशनचे एक विश्वस्त व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी लगेच दुसºया दिवशी नड्डा यांना उत्तर देताना पंतप्रधान निधीतून ही रक्कम त्सुनामीग्रस्तांच्या मदतकार्यासाठी देण्यात आल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर या फौंडेशनला चीनच्या वकिलातीकडून देणगी मिळाल्याच्या केंद्रीय मंत्री पविशंकर प्रसाद यांच्या टष्ट्वीटनेही वाद झाला होता.काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी राजीव गांधी फौंडेशन व राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संस्थांच्या अध्यक्ष आहेत तर त्यांचे चिरंजीव राहुल गांधी दोन्ही संस्थांचे विश्वस्त आहेत. सोनिया व राहुल गांधींच्या कन्या प्रियांका गांधी फौंडेशनच्या विश्वस्त आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेही फौंडेशनचे विश्वस्त आहेत अशा सूड कारवाईला काँग्रेस भीक घालत नाही‘घाबरलेल्या’ मोदी सरकारने सूड भावनेने ही कारवाई केली असली तरी अशा धाकदपटशाला आम्ही बिलकूल भीक घालत नाही, असे खणखणीत उत्तर काँग्रेसने लगेच दिला. सरकारच्या या निर्णयावर टष्ट्वीटरवरून प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लिहिले की, जग आपल्यासारखेच आहे, असे मोदींना वाटते. प्रत्येकाला विकत घेता येते किंवा धमकावून गप्प करता येते, असे ते मानतात. पण जे सत्यासाठी झगडत असतात ते कशालाच घाबरत नाहीत, हे मोदीना कधीच कळणार नाही.पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून मोदी व त्यांचया सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी लिहिले की, सरकारला धोरेवर धरण्याचा व जाब विचारण्याचा काँग्रेसचा निर्धार यामुळे आणखी बळकट होईल. आपल्या कुलंगड्या बाहेर पडतील या भीतीनेच मोदी-शहा जोडगोळीने ससेमिरा मागे लावण्याचा हा कपटी मार्ग निवडला आहे...................... 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस