Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:43 IST2025-10-04T12:43:18+5:302025-10-04T12:43:59+5:30
Cough Syrup Death: गेल्या ३० दिवसांत मृतांची संख्या नऊ झाली असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली.

Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात किडनी फेल झाल्यामुळे मुलांच्या मृत्यूचं सत्र सुरूच आहे. गेल्या ३० दिवसांत मृतांची संख्या नऊ झाली असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली. कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय आहे.बुधवारी नागपूरमध्ये उपचारादरम्यान आणखी एका मुलाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी पहिला मृत्यू झाला आणि एका महिन्यात नऊ मुलांना आपला जीव गमावला आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य विभाग आणि प्रशासन सक्रियपणे काम करत आहे.
परासियाचे उपजिल्हाधिकारी सौरभ कुमार यादव यांनी सांगितलं की, आतापर्यंत १,४०० मुलांची तपासणी करण्यात आली आहे आणि ही मोहीम सुरू आहे. संभाव्य रुग्णांची लवकर ओळख पटविण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी दररोज १२० मुलांची तपासणी केली जात आहे. परासिया परिसरात व्हायरल तापाच्या प्राथमिक उपचारानंतर, मुलांना छिंदवाडा येथे रेफर करण्यात आलं, जिथे त्यांना गंभीर किडनी इन्फेक्शन असल्याचें निदान झालं. नंतर त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले, जिथे एकामागून एक नऊ मुलांचा मृत्यू झाला.
"किडनी 'विषारी पदार्थामुळे' फेल"
शिवम, विधी, अदनान, उसैद, ऋषिका, हेतांश, विकास, चंचलेश आणि संध्या अशी मुलांची नावं आहेत. भोपाळ येथील एनएचएमचे वरिष्ठ सहसंचालक डॉ. प्रभाकर तिवारी म्हणाले, "सिरपचे नमुने घेण्यात आले आहेत, परंतु निकाल अद्याप प्रलंबित आहेत. मृत मुलांच्या बायोप्सी रिपोर्टमध्ये स्पष्टपणे दिसून येतं की त्यांची किडनी 'विषारी पदार्थामुळे' फेल झाली. हा पदार्थ कफ सिरपमध्ये होता की आणखी काही हा तपासाचा विषय आहे. डायथिलीन ग्लायकोल (डीईजी) हा औद्योगिक पदार्थ असल्याचं वारंवार सांगितलं जातं. जर ते सिरपमध्ये असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे."
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषध योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमुळे वाद निर्माण झाला आहे. सीकर आणि भरतपूरमध्ये मुलांची प्रकृती बिघडल्याची प्रकरणे आधीच नोंदवली गेली आहेत. याच दरम्यान भरतपूर जिल्ह्यातील वैरा भागात धक्कादायक घटना घडली आहे. कफ सिरपमुळे एका २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. लुहासा गावात ही घटना घडली.