शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

तटरक्षक दलाचे टेहळणी विमान तीन कर्मचा-यांसह बेपत्ता

By admin | Updated: June 10, 2015 00:05 IST

तटरक्षक दलाचे डॉर्नियर टेहळणी विमान सोमवारी रात्री अचानक बेपत्ता झाल्यामुळे विमानात असलेल्या तीन कर्मचाऱ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

चेन्नई : तटरक्षक दलाचे डॉर्नियर टेहळणी विमान सोमवारी रात्री अचानक बेपत्ता झाल्यामुळे विमानात असलेल्या तीन कर्मचाऱ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. या विमानाचा शोध घेण्यासाठी विमाने, हेलिकॉप्टर्स आणि जहाजांची सेवा घेण्यात आली आहे.गेल्या वर्षी तटरक्षक दलात सामील करण्यात आलेले सीजी-७९१ हे विमान तिरुचिरापल्ली येथील विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून होते; परंतु चिदंबरमपासून अंदाजे १६ समुद्री मैल अंतरावर कुड्डालोर आणि कराईकालच्या दरम्यान विमानाचा संपर्क तुटला आणि त्यानंतर विमान बेपत्ता झाले. बेपत्ता होण्याच्या काही क्षणापूर्वी वैमानिकाने वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केल्याचे हा अधिकारी म्हणाला. डेप्युटी कमांडर विद्यासागर (वैमानिक), डेप्युटी कमांडर एम.के. सोनी (सह-वैमानिक) आणि नेव्हीगेटर डेप्युटी कमांडर सुभाष सुरेश अशी विमानात असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सोमवारी रात्री ९.२३ वाजेनंतर या विमानाशी संपर्क होऊ शकला नाही. हे विमान १०००० फुटापेक्षा अधिक उंचीवरून उडू शकत नाही आणि ते कमी उंचीवरून उडत टेहळणी करण्यासाठी तयार केलेले आहे. या विमानाने सायंकाळी ५.३० वाजता नेहमीप्रमाणे चेन्नईहून उड्डाण केले होते आणि विमानातील सर्व तीनही कर्मचारी अतिशय अनुभवी होते, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.विमान बेपत्ता झाल्याचे कळताच त्याचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी तटरक्षक दलाची पाच आणि नौदलाची चार जहाजे आणि विमानांसोबतच हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)