मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा अचानक दिल्ली दौरा; PM मोदी, अमित शाहंची घेणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 02:12 PM2021-06-10T14:12:48+5:302021-06-10T14:13:57+5:30

योगी आदित्यनाथ लखनौवरून दिल्लीसाठी निघाले आहेत. ते थोड्याच वेळात गाझियाबादच्या हिंडन एअरपोर्टवर पोहोचतील. योगी दुपारी साधारणपणे एक वाजता दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले.

CM Yogi Adityanath to visit delhi today evening to meet PM Narendra Modi and Amit Shah | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा अचानक दिल्ली दौरा; PM मोदी, अमित शाहंची घेणार भेट

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा अचानक दिल्ली दौरा; PM मोदी, अमित शाहंची घेणार भेट

googlenewsNext
ठळक मुद्देसीएम योगी आदित्यनाथ यांनी कल लखनौ येथे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि संघटनमंत्री सुनील बंसल यांच्यासोबत बैठक केली.या बैठकीसाठी सुनील बंसल हे हेलीकॉप्टरने लखनौला पोहोचले होते.सध्या उत्तर प्रदेश भाजपमध्ये विविध प्रकारच्या राजकीय कयासांना उधान आले आहे.

लखनौ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दिल्लीत पोहोचत आहेत. ते सायंकाळी चार वाजता गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेतील. याशिवाय, काही केंद्रीयमंत्री आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही ते भेटणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊ शकतात. यानंतर, ते भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही भेटू शकतात.

योगी आदित्यनाथ लखनौवरून दिल्लीसाठी निघाले आहेत. ते थोड्याच वेळात गाझियाबादच्या हिंडन एअरपोर्टवर पोहोचतील. योगी दुपारी साधारणपणे एक वाजता दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले. मोदी-शाह यांच्या सोबतच्या या भेटीत योगींची उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होईल, असे बोलले जात आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशातील राजकीय घटनाक्रम, उत्तर प्रदेश संघट आणि मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होऊ शकते.

दिल्लीश्वरांसमोर योगी आदित्यनाथांनी दंड थोपटले, पुढे...?

रात्री उशिरापर्यंत स्वतंत्रदेव सिंह आणि सुनील बंसल यांच्याशी बैठक -
सीएम योगी आदित्यनाथ यांनी कल लखनौ येथे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि संघटनमंत्री सुनील बंसल यांच्यासोबत बैठक केली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, ही दर महिन्याला होणारी रुटीन बैठक होती, असे सांगण्यात आले आहे. पण, या बैठकीसाठी सुनील बंसल हे हेलीकॉप्टरने लखनौला पोहोचले होते.
 
ही बैठक आणि सध्या लावले जात असलेले राजकीय कयास, यांसंदर्भात माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीला गेले आहेत, असे सांगण्यात येत आहे. याशिवाय, गेल्या एक महिन्यातील घटनाक्रमासंदर्भात बोलायचे झाल्यास उत्तर प्रदेश भाजपमध्ये विविध प्रकारच्या राजकीय कयासांना उधान आले आहे. यातच नुकताच, भाजप आणि आरएसएसच्या काही मोठ्या नेत्यांनीही लखनौ दौरा केला आहे. 

दिल्लीला जाणार का? पंतप्रधान होणार का? योगी आदित्यनाथांनी सांगितल्या 'महत्त्वाकांक्षा'

Web Title: CM Yogi Adityanath to visit delhi today evening to meet PM Narendra Modi and Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.