शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

"माफ करा, मला उशीर झाला...", फक्त 10 मिनिटे विलंबाबद्दल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये मागितली माफी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 09:05 IST

ही घटना काही दिवसांपूर्वीची असल्याचे म्हटले जात आहे.

नवी दिल्ली : "माफ करा, मला उशीर झाला...", असे म्हणत ज्या व्यक्तीने माफी मागितली आहे. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय यशवंत चंद्रचूड (CJI DY Chandrachud) आहेत. कोर्ट रुममध्ये फक्त 10 मिनिटे उशिरा पोहोचल्यावर धनंजय चंद्रचूड यांनी हे मोठे मन दाखवून दिले आहे. दरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे अत्यंत वक्तशीर आहेत आणि त्याचे पालन करून ते इतर न्यायाधीश आणि प्रशासकीय अधिकार्‍यांना त्यांच्या कर्तव्याचा मोठा संदेश देत आहेत. ही घटना काही दिवसांपूर्वीची असल्याचे म्हटले जात आहे.
 
द वीकमधील (The Week) वृत्तानुसार, एक दिवस सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना कोर्टरूममध्ये पोहोचण्यास 10 मिनिटे उशीर झाला. त्यानंतर जेव्हा ते कोर्टरुमध्ये आले, तेव्हा त्यांनी सर्वात आधी कोर्टात उपस्थित असलेल्या सर्वांची माफी मागितली, असे सांगितले जात आहे. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, "माफ करा, मी सहकारी न्यायमूर्तींसोबत काहीतरी चर्चा करत होतो... त्यामुळे उशीर झाला." दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी इतक्या विलंबाबद्दल माफी मागणे काही सामान्य गोष्ट नाही.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार सिंह यांनी एका मीडिया ग्रुपला दिलेल्या निवेदनात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची आठवण करून दिली आणि सांगितले की, ते खूप शिस्तप्रिय आहेत आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन करतात. इतरांनी वेळेची पूर्ण काळजी घेऊन न्यायालयात पोहोचावे अशी त्यांची अपेक्षा आहे. तसेच, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे इतर सहकारी न्यायाधीशही सुद्धा म्हणतात की, ते सत्य सांगण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि हसतमुख सत्य सांगतात. त्यांची ही खासियत त्यांना सर्वात वेगळी आणि अत्यंत साधी-साधी मनाची व्यक्ती बनवते.

दरम्यान, धनंजय चंद्रचूड हे भारताचे 50 वे सरन्यायाधीश आहेत. मागील काही काळात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या खटल्यासंदर्भात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे नाव वारंवार चर्चेत आले आहे. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या रोखठोक व मिश्कील अशा दोन्ही बाजू सर्वसामान्यांनादेखील भावल्या आहेत. अलीकडेच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायाधीशांच्या कामांचा आणि सुट्ट्यांचा हिशेब मांडला होता. न्यायाधीश वर्षातले 200 दिवस न्यायालयात काम करतात. ते सुट्टीवर असले तरी त्यांच्या डोक्यात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, कायदे आणि नियम हेच सगळे सुरू असते, असेही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय