शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
4
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
5
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
6
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
7
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
8
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
9
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
10
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
11
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
13
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
14
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
15
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
16
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
17
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
18
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
19
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव

Citizenship Amendment Bill: आजचा दिवस ऐतिहासिक; आता कित्येक पीडितांना दिलासा मिळेल- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 22:04 IST

राज्यसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान करणाऱ्या खासदारांचे पंतप्रधान मोदींकडून आभार

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. परवा लोकसभेत संमत झालेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावर आज राज्यसभेत मतदान झालं. राज्यसभेत १२५ खासदारांनी विधेयकाच्या बाजूनं, तर १०५ खासदारांनी विरोधात मतदान केलं. त्यामुळे मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं. 'आपल्या देशाच्या बंधुभावाच्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्याचा आनंद आहे. या विधेयकाच्या बाजूनं मतदान करणाऱ्या सर्व खासदारांचे मी आभार मानतो. यामुळे कित्येक वर्षांपासून अत्याचार सहन करणाऱ्या अनेकांना दिलासा मिळेल,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.   राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीदेखील आनंद व्यक्त केला. कोट्यवधी वंचित आणि पीडितांचं स्वप्नं आज प्रत्यक्षात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीडित आणि वंचितांच्या सन्मान आणि सुरक्षिततेचा संकल्प केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार, अशा शब्दांमध्ये शहांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. राज्यसभेत विधेयक मंजूर व्हावं यासाठी शहांनी विशेष प्रयत्न केले. विरोधकांनी उपस्थित केलेले सर्व दावे खोडून काढत त्यांनी सरकारची बाजू समर्थपणे मांडली. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा