शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 10:23 IST2025-08-18T10:21:16+5:302025-08-18T10:23:45+5:30
एकूण युरिया आयात ७१.०४ लाख टनांवरून ५६.४६ लाख टनांवर

शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: चीनने केवळ महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी केली नाही, तर भारतात जाणाऱ्या खतांचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांपुढे तुटवड्याचे संकट उभे ठाकले आहे. अधिकृत आकडेवारीवरून असे दिसून येते की, २०२३-२४ मध्ये चीनमधून १८.६५ लाख टनांच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये युरिया आयात एक लाख मेट्रिक टनांपेक्षा कमी झाली आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री आज भारत दौऱ्यावर
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी सोमवारी भारत दौऱ्यावर येणार असून, भारताकडून हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खतांच्या आयातीवरील अवलंबित्वाबद्दल स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून चिंता व्यक्त केली होती. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी चीनला जाणार आहेत.