चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी दिली भाजपाच्या मुख्यालयाला भेट, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:39 IST2026-01-13T11:34:44+5:302026-01-13T11:39:51+5:30
China Communist Party Delegation Visits BJP Headquarters: चीनमधील सत्ताधारी असलेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे उपमंत्री सून हैयान यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नुकतीच दिल्ली येथील भाजपाच्या मुख्यालयाला भेट दिली.

चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी दिली भाजपाच्या मुख्यालयाला भेट, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
चीनमधील सत्ताधारी असलेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाच्या उपमंत्री सून हैयान यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नुकतीच दिल्ली येथील भाजपाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी झालेल्या बैठकीला भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उपस्थित होते. या शिष्टमंडळाने चिनी कम्युनिस्ट पक्षासोबत परस्परांमधील विचार विचारविनिमय वाढवण्यासाठीच्या मार्गांवर चर्चा केली. यावेळी चीनचेभारतातील राजदूत जू फेईहोंग हेसुद्धा उपस्थित होते.
भारतातील सत्ताधारी असलेला भाजपा आणि चीनमधील सत्ताधारी असलेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षामधील ही बैठक दोन्ही देशांमधील कुटनीतिक चर्चा सुरू असतानाच झाली आहे. भाजपाचया मुख्यालयात झालेल्या या बैठकीमागचा मुख्य अजेंडा हा चिनी कम्युनिस्ट पार्टी आणि भाजपामध्ये परस्पर सामंजस्य विकसिक करणे हा होता.
या बैठकीनंतर विजय चौथाईवाले यांनी समाज माध्यमांमधून माहिती देताना सांगितले की, राजकीय पातळीवर सामंजस्याला कशा प्रकारे अधिक प्रभावी करता येईल, याबाबत दोन्ही पक्षांनी चर्चा केली. यावेळी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाच्या उपमंत्री सून हैयान यांनी आपले विचार मांडले. तसेच द्विपक्षीय संबंधांमध्ये राजकीय पक्षांच्या भूमिकेवर भर दिला. तसेच चीनचे भारतामधील राजदूत जू फेईकोंग यांची या बैठकीला असलेली उपस्थिती ही विशेष बाब ठरली.