शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

चीनची नकारघंटा ! भारताच्या NSG सदस्यत्वासाठीच्या भूमिकेत बदल नाही

By admin | Updated: November 7, 2016 19:10 IST

अणुपुरवठादार देशांच्या संघटनेचे (एनएसजी) सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताबाबतच्या आपल्या भूमिकेत बदल करण्यास चीनने नकार दिला आहे

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 7 - अणुपुरवठादार देशांच्या संघटनेचे (एनएसजी) सदस्यत्व मिळवण्यासाठीच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनने पुन्हा एकदा खोडा घातला आहे. एनएसजी सदस्यत्वासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताबाबतच्या आपल्या भूमिकेत बदल करण्यास चीनने नकार दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या एनएसजीच्या बैठकीपूर्वी भारताच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.
शुक्रवारी व्हिएन्ना येथे एनएसजीच्या सदस्य देशांची महत्तपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चीनने सांगितले की, एनएसजीचे सदस्यत्व हवे असल्यास भारताने परमाणू अप्रसार करार (एनपीटी) वर सही करावी किंवा एनपीटी सदस्यत्व नसलेल्या देशांबाबत एलिट सदस्यांमध्ये एकमत होईपर्यंत सदस्यत्वासाठी वाट पाहावी, असे चीनने सांगितले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कँग म्हणाले, "भारताच्या एनएसजी सदस्यत्वाबाबतच्या आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही."
गेल्याच आठवड्यात भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांचे समकक्ष चीनचे यँग जेईची यांच्यात हैदराबाद येथे झालेल्या बैठकीत  डोवाल यांनी भारताच्या एनएसजी सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी चीनने भारताच्या एनएसजी सदस्यत्वासाठी आपण सकारात्मक असल्याचे संकेत दिले होते.