सीमेवर भारताचा प्लॅन '61'; चीनच्या वागण्यामागे दडली आहे भीती? 'हे' आहे तणावाचे मुख्य कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 03:32 PM2020-05-24T15:32:22+5:302020-05-24T15:45:05+5:30

याच महिन्यात 5 आणि 6 मेदरम्यान ईस्टर्न लद्दाखमध्ये भारत आणि चीनी सैन्यात वाद झाला होता. यात दोन्ही देशांच्या सैनिकांना दुखापत झाली होती.

china army and Iindian army face off on the issue of 61 roads constructed renovated by bro along on the borders sna | सीमेवर भारताचा प्लॅन '61'; चीनच्या वागण्यामागे दडली आहे भीती? 'हे' आहे तणावाचे मुख्य कारण

सीमेवर भारताचा प्लॅन '61'; चीनच्या वागण्यामागे दडली आहे भीती? 'हे' आहे तणावाचे मुख्य कारण

googlenewsNext
ठळक मुद्देडोकलाममध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादानंतर आता पहिल्यांदाच भारत आणि चीनचे लष्कर समोरासमोर याच महिन्यात 5 आणि 6 मेदरम्यान ईस्टर्न लद्दाखमध्ये भारत आणि चीनी सैन्यात वाद झाला होता9 मेरोजी भारत आणि चीनी सैन्यांत सिक्किमच्या नकुला सेक्टरमध्येही वाद झाला होता.

नवी दिल्ली : डोकलाममध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादानंतर आता पहिल्यांदाच भारत आणि चीनचे लष्कर समोरासमोर आले आले असून संबंध मोठ्या प्रमाणावर ताणले आहेत. मात्र, डोकलामच्या घटनेनंतरही सीमेवर अनेकदा छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेत. मात्र यावेळी लद्दाख सीमेवर जवानांची संख्या वाढविण्यापर्यंत प्रकरण ताणले गेले आहे. येथे चीनीसैनिकांनी टेन्ट लावले आहेत. तर दुसरीकडे भारतानेही आपली शक्ती वाढवली आहे. 

याच महिन्यात 5 आणि 6 मेदरम्यान ईस्टर्न लद्दाखमध्ये भारत आणि चीनी सैन्यात वाद झाला होता. यात दोन्ही देशांच्या सैनिकांना दुखापत झाली होती. यानंतर प्रोटोकॉलनुसार, हा वाद संपवण्यात आला होता. यानंतर 9 मेरोजी भारत आणि चीनी सैन्यांत सिक्किमच्या नकुला सेक्टरमध्येही वाद झाला होता. मात्र, यानंतर स्थानिक पातळीवरच दोन्ही पक्षांना शांत करण्यात आले.

GoodNews! देशातील 'या' जिल्ह्यांत रिकव्हरी रेटची 100 टक्क्यांकडे वाटचाल, कोरोनाला देतायत 'टफ फाईट'

यामुळे घाबरतोय चीन -
चीनच्या, अशा वागण्यामागे त्याची भीतीही दडलेली आहे. चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागांत 61 रस्त्यांचे काम आणि दुरुस्ती करण्यासाठी 2018-19 ते 2022-23पर्यंत बॉर्डर रोड ऑर्गेनायझेशनने एक विशेष योजना तयार केली आहे. 272 पैकी 3323.57 किमी लांब असलेल्या 61 रस्त्यांची ओळख एक विशेष रणनीती म्हणून करण्यात आली आहे. यापैकी 2304.65 किमीवरील काम पूर्ण झाले आहे. इतर रस्त्यांवरील कामे प्रगतीपथावर आहेत.

CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोना व्हॅक्सीनची आशा वाढली; ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची टेस्ट पुढच्या स्टेजवर

हा आहे तणावाचा मुख्य मुद्दा  -
असे समजते, की सध्या श्योक आणि गलवान नदीवर काम सुरू आहे. चीनने डब्रुक-श्योक-दौलत बेग ओल्डी रोडसंदर्भात, लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलअंतर्गत, या कामांवर आक्षेप घेतला आहे. भारत-चीन बॉर्डरवरील तणावाचा मुद्दा केवळ रस्ता निर्मितीचा आहे. चीनचे म्हणणे आहे, की भारत रस्ता तयार करण्यासाठी चीनच्या सीमेचा वापर करत आहे. तर भारताचे म्हणणे आहे, की ते आपल्या सीमेतच कामे करत आहेत. 

CoronaVirus News: 'या' देशात मोठी Tragedy बनलाय कोरोना, मृतदेह दफनायलाही कमी पडतेय जागा

 

 

Web Title: china army and Iindian army face off on the issue of 61 roads constructed renovated by bro along on the borders sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.