GoodNews! देशातील 'या' जिल्ह्यांत रिकव्हरी रेटची 100 टक्क्यांकडे वाटचाल, कोरोनाला देतायत 'टफ फाईट'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 04:13 PM2020-05-23T16:13:48+5:302020-05-23T16:25:51+5:30

देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने एक लाखचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, असे असले तरी एक आनंदाची बातमीही आहे. देशाच्या अनेक भागांत कोरोनापासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. संकटाच्या या काळात हा फार चांगला आणि दिलासादायक संकेत आहे.

गुजरातमधील अहमदाबाद महानगर पालिकेने दावा केला आहे, की गेल्या 15 दिवसांत शहरातील रिकव्हरी रेटमध्ये 140 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हरियाणातील झज्जर जिल्ह्यात बऱ्या होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 100 टक्यांच्या जवळ पोहोचला आहे. झज्जर जिल्ह्यातील 91पैकी 90 रुग्णांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. झज्जरमध्ये सुरुवातील एकही कोरोनारुग्ण नव्हता. मात्र अचानकच जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 90 झाला होता.

अहमदाबादमधून आनंदाची बातमी आली आहे. कोरोनातील सर्वाधिक प्रभावित भागांपैकी एक म्हणजे अहमदाबाद. मात्र, येथूनही एक चांगली बातमी आली आहे. येथील रिकव्हरी रेट वाडला असल्याचा दावा करण्यात येत आहे.

आयएएस राजीव गुप्ता यांनी सांगितल्याप्रमाणे 5 मेरोजी अहमदाबादचा रिकव्हरी रेट 15.85 टक्के होता. गुजरातचा रिकव्हरी रेट 22.11 टक्के होता. तर भारताचा रिकव्हरी रेट 28.62 टक्के होता. मात्र, गेल्या पंधरवड्यात अहमदाबाद प्रशासनाने आमलात आणलेल्या रणनीतीमुळे शहरात रिकव्हर होणाऱ्या रुग्णांची संख्या अनपेक्षितपणे वाढली आहे.

गुप्ता म्हणाले, गुजरातमधील 92 टक्के आणि भारतातील 43 टक्क्यांच्या तुलनेत, अहमदाबादमधील रिकव्हरी रेटमध्ये 140 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येते. 21 मेरोजी शहरातील रिकव्हर होणाऱ्या रुग्णांचा दर 38.1 टक्के नोंदवला गेला होता. तर गुजरातमधील रिकव्हरी रेट 42.51 टक्के आणि भारताचा रिकव्हरी रेट 41.06 टक्के होता.

खरे तर, अहमदाबादमधील कोरोनाचा कहर अद्यापही कमी झालेला नाही. गुजरातमध्ये गुरुवारी कोरोनामुळे 29 जणांचा मृत्यू झाला. यातील 25 लोक एकट्या अहमदाबादेतील आहेत.

140 टक्के रिकव्हरी रेट वाढण्याचा अर्थ - अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 दिवसांच्या अंतराने कोरोनाबाधितांचे रिपोर्ट पाहिले, तर अहमदाबादमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढून 38 टक्क्यांवर पोहोचले आहे. अशाप्रकारे शहरातील रिकव्हरी रेटमध्ये दुपटीपेक्षाही अधिक सुधार झाली आहे.

यामुळे वाढला रिकव्हरी रेट - कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णाच्या वाढत्या संख्ये मागे, आयसीएमआरने दिलेले नवे दिशानिर्देश, हेदेखील मुख्य कारण असू शकते. याअंतर्गत, आता डिस्चार्ज करण्यापूर्वी रुग्णांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक नाही. उपचारांच्या 14 दिवसांच्या आत रुग्णाच्या शरीरात कोरोना संबंधित कुठलेही लक्षण आढळले नाही तर त्याला डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, असे अहमदाबाद महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

अधिकाऱ्यांनी म्हटले, आहे, की आयसीएमआरच्या दिशानिर्देशांशिवाय रुग्णालयातील कर्मचारी आणि कोविड केयर सेन्टर्सद्वारे रुग्णांची उत्तम प्रकारे केली जाणारी देखभालही रिकव्हरी रेट वाढण्यामागील एक कारण आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे, शहरांवर लक्ष ठेवणाऱ्या चमुंची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे. पूर्वी 318 चमू होते आता ही संख्या 616 झाली आहे. हे चमू, कोरोनाबाधितांची लवकरात लवकर ओळख होण्यासाठी आणि रिकव्हरीसाठी महत्वाची भूमिका बजावतील, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

एप्रिल महिन्याच्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाच्या बाबतीत जवळपास 10 पटींनी वाढ झालेल्या उत्तर प्रदेशातील कानपूरची स्थिती आता हातात येऊ लागली आहे. येथे सोमवारी 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर जिल्ह्यात एकूण 316 केस आणि 269 डिस्चार्जसह कानपूरमध्ये रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 85.12 टक्क्यांवर पोहोचले आहे.