मुलांचे वरुणराजाला पावसासाठी साकडे

By Admin | Updated: July 7, 2015 22:56 IST2015-07-07T22:56:08+5:302015-07-07T22:56:08+5:30

मूर्तिजापूर : तालुक्यातील कवळा (जहागीर) येथे ५ जुलै रोजी जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी पावसासाठी धोंडी धोंडी पाणी दे..असे म्हणत वरुणराजाला साकडे घातले.

Children's Varuna Raja monsoon for rain | मुलांचे वरुणराजाला पावसासाठी साकडे

मुलांचे वरुणराजाला पावसासाठी साकडे

र्तिजापूर : तालुक्यातील कवळा (जहागीर) येथे ५ जुलै रोजी जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी पावसासाठी धोंडी धोंडी पाणी दे..असे म्हणत वरुणराजाला साकडे घातले.
येथून जवळच असलेल्या कवळा (जहागीर) सह संपूर्ण जिल्‘ाकडे मागील १५ दिवसांपासून वरुणराजाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे मशागत आणि पेरणीसाठी हजारो रुपये खर्च केले. पावसाचा काही अंदाज दिसून येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके वाळण्याच्या मार्गावर आली असून, येत्या एक-दोन दिवसात पावसाचे आगमन न झाल्यास शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते.
पाऊस येण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या मुलांनी गावात डफडे वाजवून धोंडी मागितली. यात सुमेध भगत, सागर पंडित, करण भगत, सुरज पंडित, रोहित पंडित, आर्यन पंडित, मदन अंभोरे, प्रणव ताटके, कोमल गुळदे, तेजल गुळदे, भारती पंडित, दीपक पंडित, साहील पंडित, पूनम पंडित, शिवाणी पंडित, निखिल पंडित यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Children's Varuna Raja monsoon for rain