निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन गायब?; केरळच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 08:29 IST2026-04-28T08:28:26+5:302026-04-28T08:29:06+5:30

८१ वर्षीय विजयन यांची ही ‘स्ट्रॅटेजिक शांतता’ आहे की प्रकृतीचे गंभीर कारण, याबाबत स्पष्टता नाही.

Chief Minister Pinarayi Vijayan missing after elections?; Arguments flare up in Kerala politics | निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन गायब?; केरळच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण

निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन गायब?; केरळच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण

तिरुवनंतपुरम-  केरळमध्ये ९ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे लागले आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत सक्रिय असणारे विजयन मतदानानंतर सार्वजनिक व्यासपीठावरून अचानक गायब झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

विजयन यांची अनुपस्थिती आणि विरोधकांचे सवाल
विजयन यांनी चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली असून सध्या ते विश्रांती घेत आहेत. प्रचारादरम्यान केरळच्या आरोग्य व्यवस्थेचे गुणगाण गाणारे विजयन उपचारासाठी राज्याबाहेर का गेले? असा बोचरा सवाल आता विरोधकांनी उपस्थित केला आहे. ८१ वर्षीय विजयन यांची ही ‘स्ट्रॅटेजिक शांतता’ आहे की प्रकृतीचे गंभीर कारण, याबाबत स्पष्टता नाही.

एलडीएफला खात्री, काँग्रेसमध्ये चढाओढ 
डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करून इतिहास रचण्याचा विश्वास व्यक्त करत आहे. विजयन यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये पुन्हा ‘लाल वादळ’ येईल, असा डाव्यांचा दावा आहे. दुसरीकडे, १० वर्षांनंतर सत्तेत पुनरागमन करण्याच्या आशेने बसलेल्या काँग्रेसमध्ये निकालाआधीच मुख्यमंत्री कोणाला करावे, यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी अनेक चेहरे इच्छुक असल्याने अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे.

Web Title : चुनाव के बाद मुख्यमंत्री पिनराई विजयन गायब; केरल में अटकलों का बाजार गर्म

Web Summary : केरल चुनाव बाद मुख्यमंत्री विजयन की अनुपस्थिति से राजनीतिक चर्चा तेज। विपक्ष ने उनके बाहरी इलाज पर सवाल उठाए। एलडीएफ को जीत का भरोसा, कांग्रेस में नतीजों से पहले नेतृत्व की खींचतान। अटकलें तेज।

Web Title : Kerala CM Pinarayi Vijayan's Post-Election Absence Sparks Speculation, Political Tensions

Web Summary : After Kerala's election, CM Vijayan's absence fuels political debate. Opposition questions his out-of-state treatment. LDF anticipates victory, while Congress faces internal leadership struggles before results. Speculation rises.