Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:57 IST2025-10-09T11:55:42+5:302025-10-09T11:57:06+5:30
Cough Syrup : वेदांश त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील कपिल पवार यांनी ढसाढसा रडत सुरुवातीला त्याला कोणतीही मदत मिळाली नाही असं सांगितलं.

Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
छिंदवाडामध्ये कोल्ड कफ सिरपमुळे आतापर्यंत २० मुलांचा मृत्यू झाला आहे. बहुतेक मुलांचा मृत्यूनागपूरच्या रुग्णालयात झाला आहे. ७ ऑक्टोबर रोजी अडीच वर्षांच्या वेदांश पवारचा नागपूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला. वेदांश त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील कपिल पवार यांनी ढसाढसा रडत सुरुवातीला त्याला कोणतीही मदत मिळाली नाही असं सांगितलं.
नागपूरच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर वेदांशची प्रकृती आणखी बिघडली. त्याच्या वडिलांनी सांगितलं की, रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो फक्त म्हणायचा, "पप्पा, मला तुमचा मोबाईल द्या ना. ब्रश करू द्या." ६ सप्टेंबर रोजी वेदांशची प्रकृती बिघडली. त्याला सर्दी, खोकला आणि ताप आला होता. त्याचे वडील कपिल पवार त्याला बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण सोनी यांच्याकडे उपचारासाठी घेऊन गेले.
"ते औषध नव्हतं, विष होतं, मी स्वत: माझ्या मुलाला..."; लेकाच्या मृत्यूनंतर आईचा टाहो
प्रवीण सोनी यांनी उपचार केल्यानंतरही, वेदांशची प्रकृती सुधारली नाही. त्यानंतर त्याचे वडील त्याला ९ सप्टेंबर रोजी छिंदवाडा येथील डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यानंतर मुलाला नागपूरच्या कलर्स हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ११ सप्टेंबरपासून नागपूरच्या कलर्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. किडनीच्या समस्या असल्याचं समोर आलं. अनेक दिवस उपचार सुरू राहिले, परंतु मुलामध्ये कोणतीही सुधारणा दिसून आली नाही. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता त्याचा मृत्यू झाला.
पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
नागपूरच्या रुग्णालयात शवविच्छेदन तपासणी करण्यात आली. वेदांश हा परसियाजवळील रिधोरा येथील रहिवासी होता. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रवीण सोनी यांनी कोल्ड्रिफ सिरप लिहून दिलं होतं. १० सप्टेंबर रोजी मुलाने लघवी करणे बंद केलं. सिरप घेतल्यानंतर पाचव्या दिवशी त्याची प्रकृती बिघडली, ज्यामुळे त्याला नागपूरला जावं लागलं.
"डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
कपिल पवार यांनी त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा गमावला, त्यांनी सांगितलं की, उपचारासाठी तब्बल १०-१२ लाख रुपये खर्च आला, परंतु मुलाला वाचवता आलं नाही. सुरुवातीला सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही असे कपिल म्हणाले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णाला पाहण्यासाठी लोक येऊ लागले आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.