आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:50 IST2025-10-04T19:50:09+5:302025-10-04T19:50:43+5:30
कफ सिरपमुळे आणखी एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे मृतांची संख्या १० वर पोहोचली आहे.

आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे कफ सिरपमुळे आणखी एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे मृतांची संख्या १० वर पोहोचली आहे. किडनी फेल झाल्यामुळे योगिताचा मृत्यू झाला. गेल्या आठवडाभरापासून नागपुरात या मुलीवर उपचार सुरू होते. याच दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी याला मानवनिर्मित घटना म्हटलं आहे आणि मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
कमलनाथ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "विषारी कफ सिरपमुळे आतापर्यंत छिंदवाडा येथे दहा मुलांचा मृत्यू झाला आहे. या दुःखाच्या वेळी माझ्या भावना पीडित कुटुंबांसोबत आहेत. परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे की, ही केवळ दुर्घटना नाही तर मानवनिर्मित घटना आहे. मी मध्य प्रदेश सरकारकडे प्रत्येक मृत मुलाच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी करतो."
ज़हरीला कफ सिरप पीने से अब तक छिंदवाड़ा में 10 बच्चों की मौत हो चुकी है। दुख की इस घड़ी में मेरी भावनाएँ पीड़ित परिवारों के साथ हैं।
— Kamal Nath (@OfficeOfKNath) October 4, 2025
लेकिन यह याद रखना होगा कि यह महज़ दुर्घटना नहीं बल्कि मानव निर्मित त्रासदी है। मैं मध्य प्रदेश सरकार से माँग करता हूँ कि एक-एक मृत बच्चे के…
"असे रिपोर्ट येत आहेत की, अजूनही आजारी असलेली मुलं स्वतःच वैद्यकीय खर्च उचलत आहेत आणि त्यांना पुरेशी सरकारी मदत मिळालेली नाही. मध्य प्रदेश सरकारला सर्व आजारी मुलांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्याचं आवाहन करण्यात येत आहे. राज्यात विकल्या जाणाऱ्या औषधांकडे सरकारने लक्ष द्यावं. राज्यात पुन्हा अशी दुर्घटना घडू नये यासाठी बनावट आणि विषारी औषधांविरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे" असं कमलनाथ यांनी म्हटलं .
तामिळनाडू सरकारने केलेल्या तपासणीत असं दिसून आलं की, कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये विषारी पदार्थांचं प्रमाण जास्त होतं. ते लहान मुलांसाठी विषापेक्षा कमी नव्हतं. या रिपोर्टनंतर, मोहन यादव सरकारने मध्य प्रदेशात या सिरपवर बंदी घातली आहे आणि दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे. या कफ सिरपमुळे अनेक चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.