Chhattisgarh Assembly Elections 2018 Live Updates : संध्याकाळी ४.३० पर्यंत ५६.५८ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 09:00 AM2018-11-12T09:00:06+5:302018-11-12T13:19:16+5:30

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळी सुरुवात झाली आहे. बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

Chhattisgarh Assembly Elections 2018 Live Updates: 18 Constituencies Vote In First Phase | Chhattisgarh Assembly Elections 2018 Live Updates : संध्याकाळी ४.३० पर्यंत ५६.५८ टक्के मतदान

Chhattisgarh Assembly Elections 2018 Live Updates : संध्याकाळी ४.३० पर्यंत ५६.५८ टक्के मतदान

Next

रायपूर -  छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (12 नोव्हेंबर) सकाळी सुरुवात झाली आहे. बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तर छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांसाठी 12 आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होत आहे. 

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. तर राजनंदगाव येथील पाच मतदारसंघात आणि बस्तर येथील 3 मतदारसंघांमध्ये सकाळी 8 ते 5 यावेळेत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे. 

Chhattisgarh Assembly Elections 2018 Live Updates :

- छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये संध्याकाळी ४.३० पर्यंत ५६.५८ टक्के मतदान 



 

- विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 47.18 टक्के मतदान





- दुपारी 1 पर्यंत 25.15 टक्के मतदान





- जगदलपूरच्या गांधी नगरमधील अनेकांची नावं मतदारयादीतून गायब




-  सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत 16.24 टक्के मतदान झाले


-  नक्षल प्रभावी सुकमा जिल्ह्यातील किस्तरम,पालेम आणि बेज्जीमध्ये मतदान सुरू 






- सकाळी 10 वाजेपर्यंत 10.7 टक्के मतदान



 




- राजनंदगावातील कमला महाविद्यालयातील पिंक मतदान केंद्रावर तांत्रिक कारणांमुळे थांबलेलं मतदान पुन्हा सुरू



- राजनंदगावच्या संगवारीमधील कमला कॉलेजमधील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; मतदान थांबलं


- निवडणूकआयोगाने महिलांसाठी विशेष बूथ तयार केले असून त्याला संगवारी असे नाव दिले आहे; यात अधिकाधिक महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


- 200संवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे आणि कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला. 


- विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; राजनांदगावच्या ५ तर बस्तरच्या ३ जागांसाठी आज होणार मतदान



- Chhattisgarh Assembly Election : दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट



- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेकेट बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतमोजणी 11 डिसेंबरला होणार आहे. 







 


 

Web Title: Chhattisgarh Assembly Elections 2018 Live Updates: 18 Constituencies Vote In First Phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.