शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

छत्तीसगडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 10:00 AM

छत्तीसगडमधील धनिकरका येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी (18 एप्रिल) चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

ठळक मुद्दे छत्तीसगडमधील धनिकरका येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी चकमक झाली आहे.चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. सकाळी सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला.

रायपूर - छत्तीसगडमधील धनिकरका येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी (18 एप्रिल) चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या कुआकोंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धनिकरका वन क्षेत्रात गुरुवारी ही चकमक सुरू झाली. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर चकमकी दरम्यान एक नक्षलवादी गंभीर जखमी झाला आहे. सकाळी सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या पोलिसांनीही गोळीबार केला. चकमकीदरम्यान दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले असून त्यामध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर वर्गीसचा समावेश आहे. वर्गीसवर पाच लाखांचे बक्षिस होते. 

छत्तीसगडमधील चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा

सुकमामधील बिमापूरममध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी (26 मार्च) चकमक झाली होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा येथे नक्षलवादी आणि कमांडो बटालियन दरम्यान चकमक झाली होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. बिमापूरमपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर ही चकमक झाली. कोबरा 201 बटालियनचे कमांडो सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी कमांडोंच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला होता. या गोळीबारात 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. या चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले. नक्षलवाद्यांकडून 1 रायफल आणि दोन थ्री नॉट थ्री रायफल ताब्यात घेण्यात आल्या होत्या.

Naxal Encounter : जवानांच्या चकमकीत नक्षलवाद्याचा खात्मा

झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत पीपल्स लिबरेशन फ्रंटचा (पीएलएफआय) एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. या नक्षलवादी संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई राबवली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास जवानांनी पीएलएफआयच्या नक्षलवाद्याला कंठस्नान घातले होते. 

रांचीचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) ए.बी.होमकर यांनी कारवाईबाबत माहिती दिली होती. होमकर म्हणाले की, रनिया पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये गुरूवारी पहाटेच्या सुमारास चमकम उडाली होती. नक्षलविरोधी मोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. दरम्यान, जवानांनी घटनास्थळावरुन शस्त्रसाठा ताब्यात घेतला होता. 

छत्तीसगडमधील चकमकीत 10 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील बीजापूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी (7 फेब्रुवारी) सकाळी चकमक झाली होती. या चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. तसेच घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता. एसपी मोहित गर्ग यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रीक्ट रिझर्व गार्ड्सच्या जवानांनी ही कामगिरी बजावली होती. याआधी झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी (29 जानेवारी)  चकमक झाली होती. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. तसेच घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता. 

 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी