गरीब रुग्णांवर १० रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू, कोरोनावर केली होती मात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 06:19 PM2020-07-24T18:19:59+5:302020-07-24T18:21:15+5:30

मृत्यूच्या एक दिवसापूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती...

Chennai's 10 Rupee Doctor Who Treated Thousands Of Poor Dies After Recovering From COVID-19 | गरीब रुग्णांवर १० रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू, कोरोनावर केली होती मात

गरीब रुग्णांवर १० रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू, कोरोनावर केली होती मात

googlenewsNext

चेन्नईचे प्रसिद्ध डॉक्टर सी मोहन रेड्डी यांचे निधन झाले. गरीब रुग्णांवर 10 रुपयांच उपचार करणारे डॉक्टर म्हणून ते संपूर्ण चेन्नईत प्रसिद्ध होते. 84 वर्षीय रेड्डी हे बुधवारी अचानक पडले आणि श्वसनसंस्था निकामी झाली. त्यामुळे त्यांचे निधन झाले. 

विल्लीवक्कम येथे त्यांचा दवाखाना आहे आणि त्यांनी कोरोनावर मात केली होती. कोरोनावर मात करण्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना मृत्यूनं कवटाळलं. 25 जूनला त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले होते आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.

IPL 2020 मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची रोज कोरोना टेस्ट करा; फ्रँचायझी मालकाची मागणी

आंध्र प्रदेशातील नेल्लोर येते 1936साली त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी गुडूर येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर किलपौक वैद्यकिय महाविद्यालयातून पदवी घेतली. त्यानंतर ते तामिळनाडू येथे स्थायिक झाले आणि गरीबांसाठी 30 खाटांचं नर्सिंग होम चालू केले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच विल्लीवक्कम येथील लोकांमध्ये दुःखाचं वातावरण पसरलं. विशेषतः तेथील गरीब भागांत. एखाद्याची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट असल्यास, ते त्याच्याकडून उपचाराचे पैसेही घेत नव्हते.

दरम्यान, भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 12 लाख 92, 209 इतकी झाली आहे. त्यापैकी 8 लाख 17, 743 रुग्ण बरे झाले आहेत, तर 30,660 रुग्णांचा जीव गेला आहे.
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 रद्द करणं बीसीसीआयला परवडलं नसतं, जाणून घ्या का ? 

'iPhone'ची मोठी घोषणा; आता 'I'चा अर्थ इंडिया, चीनला मोठा धक्का! 

IPL 2020 ची फायनल 8 नोव्हेंबरला; जाणून घ्या भारतीय खेळाडू UAEला कधी होणार रवाना

Breaking : क्रीडा विश्वाकडून चीनला मोठा दणका; सर्व स्पर्धा केल्या रद्द!

Video : प्रत्येक वेळी जिंकणं महत्त्वाचं नसतं; दिव्यांग मुलीची जिद्द पाहून कराल कडक सॅल्यूट!

OMG : IPL 2020 यूएईत होणार असल्यानं मुंबई इंडियन्सची चिंता वाढली!

अल्लाह तुझं रक्षण करो; इंग्लंड दौऱ्यावर निघालेल्या पाकिस्तानी खेळाडूसाठी पत्नीनं लिहिली भावनिक पोस्ट

Web Title: Chennai's 10 Rupee Doctor Who Treated Thousands Of Poor Dies After Recovering From COVID-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.