शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
3
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
4
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
5
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
6
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
7
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
8
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
9
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
10
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
11
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
12
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
13
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
14
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
15
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
16
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
17
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
18
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
19
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
20
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाच्या रोस्टरमध्ये बदल

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

नागपुरात चार युगलपीठे : ५ जानेवारीपासून अंमलबजावणी

नागपुरात चार युगलपीठे : ५ जानेवारीपासून अंमलबजावणी

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या रोस्टरमध्ये नियमित प्रक्रियेनुसार बदल करण्यात आला आहे. नागपूर खंडपीठात यापुढे नवीन आदेशापर्यंत चार युगलपीठे कार्य करणार आहेत. नवीन रोस्टर ५ जानेवारीपासून लागू होईल.
नवीन रोस्टरमध्ये न्यायमूर्तींसह त्यांच्या कामकाजातही फेरबदल करण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तीद्वय अनुप मोहता व पुखराज बोरा यांच्या युगलपीठाकडे २०१५ मध्ये दाखल जनहित याचिका व इतर न्यायपीठाला न दिलेल्या दिवाणी रिट याचिका, न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व नितीन सांबरे यांच्याकडे ३१ डिसेंबर २०१४ पर्यंतच्या सर्व जनहित याचिका, कौटुंबिक न्यायालय अपील, लेटर्स पेटेन्ट अपील, टॅक्स अपील, फर्स्ट अपील, न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अशोक भंगाळे यांच्या युगलपीठाकडे १९९८ पर्यंतच्या, २००० ते २००५, २०११ ते २०१३ व ३० जून २०१४ पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका, तर न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांच्या युगलपीठाकडे सर्व फौजदारी याचिकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
एकलपीठामध्ये न्यायमूर्ती प्रसन्न वराळे हे फौजदारी अपील, जामीन व अटकपूर्व जामीन अर्ज, न्यायमूर्ती रवी देशपांडे हे २०००, २००२, २००४, २००६, २००८ व १ सप्टेंबर २०१४ पुढील दिवाणी रिट याचिका, २०१० पर्यंतच्या सेकंड अपील, न्यायमूर्ती सुनील शुक्रे फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी कलम ४८२ अंतर्गतचे अर्ज, २०१० पर्यंतच्या फौजदारी अपील, न्यायमूर्ती झेड. ए. हक फर्स्ट अपील, अपील अगेन्स्ट ऑर्डर, दिवाणी पुनर्विचार अर्ज, एमसीए, तर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर हे २००१, २००३, २००५, २००७, २००९, २०१३ व १ जानेवारी २०१४ ते ३१ ऑगस्ट २०१४ पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका व २०११ पासून पुढे दाखल सेकंड अपीलचे कामकाज पाहतील.