पती तेजप्रताप यादव विरोधात निवडणूक लढणार ऐश्वर्या? वडील चंद्रिका राय यांच्याकडून संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 08:39 PM2020-08-20T20:39:25+5:302020-08-20T20:46:11+5:30

लालूप्रसाद यादव यांचे व्याही चंद्रिका राय यांच्यासह आमदार जयवर्धन यादव आणि फराज फातमी यांनी जेडीयूचे सदस्यत्व स्वीकार

Chandrika Rai Gave Indication Of Aishwarya Rai May Contest Elections From Mahua Vidhan Sabha Constituency | पती तेजप्रताप यादव विरोधात निवडणूक लढणार ऐश्वर्या? वडील चंद्रिका राय यांच्याकडून संकेत

पती तेजप्रताप यादव विरोधात निवडणूक लढणार ऐश्वर्या? वडील चंद्रिका राय यांच्याकडून संकेत

googlenewsNext
ठळक मुद्देजेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांचे व्याही चंद्रिका राय यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पटना : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गुरुवारी राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) तीन आमदारांनी जनता दल युनायटेडमध्ये (जेडीयू) प्रवेश केला. त्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांना दिलेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कारण, या तीन आमदारांमध्ये लालूप्रसाद यादव यांचे व्याही चंद्रिका राय यांच्यासह आमदार जयवर्धन यादव आणि फराज फातमी यांनी जेडीयूचे सदस्यत्व स्वीकारले. 

जेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांचे व्याही चंद्रिका राय यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रिका राय यांनी आरजेडीवर जोरदार टीका केली. 'लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांनी लोकसभा उमेदवाराच्या विरुद्ध काम केल्यानंतरही पक्षाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही' असे सांगत चंद्रिका राय यांनी आपली मुलगी आणि तेजप्रताप यादव यांची पत्नी ऐश्वर्या राय या जदयूच्या तिकीटावर बिहारच्या महुआ मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे असे संकेत दिले आहेत.

एका खासगी चॅनलशी बातचीत करताना, 'तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव हे दोघे भाऊ कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार? याची माहिती असेल तर आम्हालाही सांगा... असे ऐकले आहे की दोघेही मतदारसंघ शोधत आहेत,' असे म्हणत चंद्रिका राय यांनी टीका केली आहे. विशेष म्हणजे, तेजप्रताप यादव सध्या वैशाली जिल्ह्यातल्या महुआ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अशा वेळी चंद्रिका राय हे आपली मुलगी ऐश्वर्या राय यांनाच या मतदारसंघातून जदयूच्या तिकीटावर उमेदवारी मिळवून देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते.

Aishwarya Rai In Bihar Election: Chandrika Rai Hints Aishwarya Rai ...

दरम्यान, चंद्रिका राय यांचा राजकीय प्रवास १९८५ मध्ये सुरू झाला होता. वडील दारोगा राय यांच्याप्रमाणेच काँग्रेसच्या तिकीटावर ते १९८५ ची निवडणूक लढले आणि पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. १९९० मध्ये त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या पक्षात प्रवेश केला. २००५ आणि २०१० साली चंद्रिका राय यांना जदयूच्या छोटेलाल राय यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. परंतु, २०१५ मध्ये चंद्रिका राय पुन्हा एकदा निवडून आले.

आणखी बातम्या...

१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार    

आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय 'असे' असतील; नितेश राणेंची खोचक टीका    

मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना; गजेंद्रसिंह शेखावत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!    

जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी    

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार    

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा    

'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया  

Web Title: Chandrika Rai Gave Indication Of Aishwarya Rai May Contest Elections From Mahua Vidhan Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.