१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 01:45 PM2020-08-20T13:45:20+5:302020-08-20T18:23:41+5:30

Ayodhya Ram Mandir : मंदिराच्या बांधकामात सुमारे १० हजार तांब्याचे रॉड वापरले जातील. जर लोकांना मंदिर बांधकामासाठी मदत करायची असेल तर ते तांबे दान करू शकतात, असे चंपत राय म्हणाले.

ram temple will stand for 1000 years only stones to be used for building | १००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार

१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार

Next
ठळक मुद्देचंपत राय हे विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा आहेत. दगडांनी बांधलेले मंदिर हजार वर्षांहून अधिक काळ राहील, असे चंपत राय यांचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी फक्त दगडांचाच वापर करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे. दगडांनी बांधलेले मंदिर हजार वर्षांहून अधिक काळ राहील, असे चंपत राय यांचे म्हणणे आहे.

चंपत राय हे विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा आहेत. मंदिर बांधकाम प्रक्रियेत आयआयटी-चेन्नई आणि केंद्रीय इमारत संशोधन संस्था (सीबीआरआय) च्या सदस्यांशीही सल्लामसलत केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

चंपत राय यांनी गुरुवारी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी राम मंदिराचे बांधकाम लार्सन अँड टूब्रो कंपनी करणार आहे. आयआयटी-चेन्नईचे अभियंते येथील जमिनीच्या क्षमतेची पाहणी करतील. तर, मंदिरातील भूकंप प्रतिरोधक करण्यासाठी सीबीआरआयच्या लोकांचा सल्ला घेतला जात आहे, असे चंपत राय यांनी सांगितले.                                         

याचबरोबर, मंदिराच्या बांधकामात सुमारे १० हजार तांब्याचे रॉड वापरले जातील. जर लोकांना मंदिर बांधकामासाठी मदत करायची असेल तर ते तांबे दान करू शकतात, असे चंपत राय म्हणाले. याशिवाय, राम मंदिर दगडांनी अशा प्रकारे बांधले जाणार आहे. ज्यामुळे वारा, पाणी आणि सूर्यप्रकाशामुळे नुकसान होणार नाही आणि हजारो वर्षे मंदिर उभे राहील, असे चंपत राय यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यानंतर मंदिराच्या बांधकामाची तयारीही जोरात सुरू झाली आहे.


आणखी बातम्या...

जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी    

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार    

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा    

'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया     

भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा    

अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर    

शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय    

Web Title: ram temple will stand for 1000 years only stones to be used for building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.