शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

पिक्चर अभी बाकी है! भविष्यात चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून दाखवू - के. सिवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 16:28 IST

ISRO Update : महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्टभागावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग न झाल्याने इस्रोला धक्का बसला होता. मात्र चांद्रयान-2 मोहिमेच्या अगदी निर्णायक टप्प्यावर आलेले अपयश झटकून इस्रो पुढच्या तयारीला लागली आहे.

नवी दिल्ली - महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्टभागावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग न झाल्याने इस्रोला धक्का बसला होता. मात्र चांद्रयान-2 मोहिमेच्या अगदी निर्णायक टप्प्यावर आलेले अपयश झटकून इस्रो पुढच्या तयारीला लागली आहे. येत्या काळात चंद्राच्या पृष्टभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचे पूर्ण प्रयत्न केले जातील, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन  यांनी दिली आहे. तसेच पुढच्या काही दिवसांमध्ये अॅडव्हान्स सॅटेलाइटचे प्रक्षेपण करण्याची योजना इस्रोसकडून आखण्यात आली आहे. चांद्रयान-2च्या लँडरला चंद्राच्या पृष्टभागावर लँडिंग करण्यात आलेल्या अपयशाबाबत इस्रोचे प्रमुख म्हणाले की, ''चांद्रयान-2 च्या कहाणीची अद्याप अखेर झालेली नाही. भविष्यात चंद्राच्या पृष्टभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. चांद्रयान-2 मोहिमेबाबत तुम्हाला माहिती असेलच. तांत्रिक बाबींचा विचार केला तर आम्ही विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिग करू शकलो नाही ही बाब खरी आहे. पण चंद्राच्या पृष्टभागापासून 300 मीटर अंतरापर्यंत संपूर्ण प्रणाली व्यवस्थित काम करत होती.'' ''अखेरच्या टप्प्यात मोहिमेला अपयश आले असले तरी आमच्याकडे खूप मह्त्त्वपूर्ण माहिती गोळा झालेली आहे. आता भविष्यात इस्रो आपला अनुभव आणि तांत्रिक खबरदारीच्या जोरावर सॉफ्ट लँडिंगसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.'' असा विश्वास सिवन यांनी व्यक्त केला. इस्रोच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आयआयटीमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी इस्रोचे प्रमुख उपस्थित होते. चांद्रयान-2 मोहीम ही काही कथानकाची अखेर नाही आहे. आमचे आदित्य एल-1 सोलर मिशन, ह्युमन स्पेसफ्लाइट प्रोग्रॅम सध्या प्रगतीपथावर आहेत. येत्या काही महिन्यांत अॅडव्हान्स सॅटेलाइटही लाँच करण्यात येणार आहेत. एसएसएलव्ही डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये उड्डाण करणार आहे.  200 टन सेमी क्रायो इंजिनाची टेस्टिंग लवकरच सुरू होणार आहे. तसेच मोबाइल फोनवर  NAVIC सिग्नल पाठवण्याबाबतही लवकरच काम सुरू होणार आहे.  

टॅग्स :isroइस्रोK. Sivanके. सिवनIndiaभारत