शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Chandrayaan 2: इस्रोने मानले देशवासियांचे आभार, सांगितले भारतीयांची स्वप्ने पूर्ण करत राहू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 8:55 AM

भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतरही देशभरातून इस्रोला पाठिंबा मिळाला होता. दरम्यान...

ठळक मुद्देचांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतरही  देशभरातून इस्रोला पाठिंबा मिळाला होता इस्रोने चांद्रयान-2 मोहिमेला मिळालेल्या पाठिंब्यासाठी देशवासियांचे आभार मानले आहेतजगभरात वसलेल्या भारतीयांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करत राहण्याचे इस्रोने दिले आश्वासन

बंगळुरू  - भारताच्याचांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतरही  देशभरातून इस्रोला पाठिंबा मिळाला होता. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनेचांद्रयान-2 मोहिमेला मिळालेल्या पाठिंब्यासाठी देशवासियांचे आभार मानले आहेत. तसेच जगभरात वसलेल्या भारतीयांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करत राहू, असे आश्वासन दिले.  इस्रोने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट केले आहे. ''आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे आभार. जगभरातील भारतीयांच्या अपेक्षा आणि स्वप्नांच्या बळावर आम्ही सातत्याने पुढे जात राहू,'' असे इस्रोनो आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. चांद्रयान मोहिमेच्या 47 व्या दिवशी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरणार होता. मात्र चंद्राच्या पृष्टभागापासून  केवळ 2.1 किमी अंतरावर असताना त्याचा ऑर्बिटर आणि इस्रोशी असलेला संपर्क तुटला होता.  

 पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या आपल्या 47 दिवसांच्या प्रवासात चांद्रयान-2 ने अनेक अवघड टप्पे पार केले होते. मात्र मात्र शेवटचा टप्पा पार करताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटून त्याचे चंद्राच्या पृष्टभागावर हार्ड लँडिंग झाले होते. त्यानंतर चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्टभागावर पडलेल्या विक्रम लँडरचे छायाचित्र पाठवले होते. मात्र विक्रमशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केल्यानंतरही त्यात अद्याप यश आलेले नाही.विक्रमशी अद्याप संपर्क होऊ न शकल्याने विक्रम लँडरमध्ये असलेल्या रोव्हर प्रज्ञानच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्टभागावरील माहिती मिळवण्याचा कार्यात अडचण निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरी इस्रोसह जगभरातील अंतराळ संशोधन संस्थां आणि शास्रज्ञांनी चांद्रयान-2 मोहीम आपले 95 लक्ष्य प्राप्त करण्यात यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.   

टॅग्स :isroइस्रोChandrayaan 2चांद्रयान-2Indiaभारत