शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या बलुचिस्तानविषयीच्या भाषणाचे देशाला परिणाम भोगावे लागण्याची शक्यता- सलमान खुर्शीद

By admin | Updated: August 15, 2016 20:51 IST

मोदींच्या पाकव्याप्त बलुचिस्तानच्या मुद्द्यावर केलेल्या भाष्यामुळे पाकव्याप्त काश्मीरवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी दिलेल्या भाषणात बलुचिस्तान व पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्र व्हावे, यांचे जाहीरपणे समर्थन केले. मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसनं मोदींवर जोरदार टीका केली आहे.

मोदींच्या पाकव्याप्त बलुचिस्तानच्या मुद्द्यावर केलेल्या भाष्यामुळे पाकव्याप्त काश्मीरवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केली आहे. "पाकव्याप्त काश्मीर हा आपला हक्क आहे. मात्र त्यामध्येच बलुचिस्तानचा विषय आणून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा अडचणीत सापडू शकतो. आपणच हा मुद्दा संवेदनशीलरीत्या हाताळत नसल्याचं" म्हणत सलमान खुर्शीद यांनी नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे.

"आपण शेजारील देशातल्या अत्याचाराबाबत न बोलता असे विषय उपस्थित केल्यास पाकिस्तानच्या हाती आयतं कोलीत मिळेल", असंही सलमान खुर्शीद म्हणाले आहेत. मोदींना पाकव्याप्त काश्मीरऐवजी बलुचिस्तानचा विषय उपस्थित करण्याचा सल्ला कोणी दिला हे माहीत नसल्याचं म्हणत खुर्शीद यांनी मोदींवर शरसंधाण साधलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणांविषयी अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून शिकण्याची गरज असल्याचा टोलाही यावेळी सलमान खुर्शीद यांनी लगावला आहे.