चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 16:23 IST2025-10-12T16:22:26+5:302025-10-12T16:23:47+5:30
India Afghanistan Talks: अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली.

चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
India Afghanistan Talks: अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी सध्या 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात भारत-अफगाणिस्तान संबंधांबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आज(दि.12) नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान घेतलेल्या निर्णयांची सविस्तर माहिती दिली.
व्यापार, गुंतवणूक आणि वाहतूकीवर भर
आमिर खान मुत्ताकी यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी भेट घेतली. या बैठकीत आर्थिक, व्यापारी आणि राजनैतिक सहकार्य यांवर चर्चा झाली. याबाबत मुत्ताकी म्हणाले की,'भारताने काबुलमधील आपल्या मिशनला दूतावास पातळीवर अपग्रेड करण्याची घोषणा केली आहे. काबुलचे राजनैतिक अधिकारीही लवकरच दिल्लीला येतील. दोन्ही देशांदरम्यान हवाई संपर्क वाढवणे, व्यापार करार आणि गुंतवणुकीच्या संधी यावर सहमती झाली आहे.'
#WATCH | Delhi | Afghanistan Foreign Minister Amir Khan Muttaqi says, "... I met the Minister of External Affairs of India and talked about economy, trade, and other issues. During the meeting, the EAM of India announced the upgrading of their mission in Kabul to Embassy level… pic.twitter.com/CdbCEKDEVg
— ANI (@ANI) October 12, 2025
दिल्ली-काबुल उड्डाणे वाढवणार
मुत्ताकी पुढे म्हणाले, 'भारताने काबुल-दिल्ली उड्डाणांची संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे. व्यापार आणि अर्थव्यवस्था क्षेत्रातही करार झाले आहेत. आम्ही भारताला अफगाणिस्तानमध्ये गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले आहे, विशेषतः खनिज, शेती आणि क्रीडा क्षेत्रात. या चर्चेदरम्यान चाबहार बंदर आणि वाघा बॉर्डरवरील व्यापार मार्गांवरही चर्चा झाली. वाघा सीमा भारत-अफगाणिस्तानमधील सर्वात जलद आणि सोपा व्यापार मार्ग आहे. आम्ही ती खुली करण्याची विनंती केली आहे,' अशी माहिती मुत्ताकी यांनी दिली.
#WATCH | Delhi | On the issue of women journalists not being invited to his presser two days ago, Afghanistan Foreign Minister Amir Khan Muttaqi says, "With regards to the press conference, it was on short notice and a short list of journalists was decided, and the participation… pic.twitter.com/zM8999yc0l
— ANI (@ANI) October 12, 2025
महिला पत्रकारांना विशेष निमंत्रण
आमिर खान मुत्ताकी यांनी शुक्रवारी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने बराच वाद झाला होता. मात्र, आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महिला पत्रकारांना विशेष निमंत्रण दिले आणि या प्रकरणावर आपली भूमिकाही मांडली. 'पत्रकार परिषद अचानक ठरवल्यामुळे महिला पत्रकारांना बोलवण्यात आले नव्हते. यामागे इन्य कोणताही अन्य हेतू नव्हता,' असे त्यांनी सांगितले.