शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

प्रायव्हसी पॉलिसीतील बदल मागे घ्या; केंद्र सरकारचं थेट व्हॉट्स ऍपच्या सीईओंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 16:10 IST

भारतीयांचा योग्य आदर व्हायला हवा; केंद्रानं व्हॉट्स ऍपच्या सीईओंना सुनावलं

नवी दिल्ली: व्हॉट्स ऍपच्या प्रस्तावित प्रायव्हसी पॉलिसीबद्दल केंद्र सरकारनं चिंता व्यक्त केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं व्हॉट्स ऍपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल कॅथकार्ट यांना पत्र लिहिलं आहे. व्हॉट्स ऍपचे सर्वाधिक वापरकर्ते भारतात आहेत. त्यामुळे व्हॉट्स ऍप सुविधेसाठी भारत मोठी बाजारपेठ असल्याचं मंत्रालयानं पत्रात नमूद केलं आहे.WhatsApp Web च्या सुरक्षिततेलाही धोका; युजर्सचे फोन नंबर Google Search वर लीक, रिपोर्टमधून दावाव्हॉट्स ऍपनं प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्स ऍपच्या नव्या धोरणामुळे गोपनीयता धोका होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. याबद्दल व्हॉट्स ऍपनं स्पष्टीकरण दिल्यानंतर लोकांच्या मनातील संभ्रम कायम आहे. नव्या धोरणाला मान्यता देण्यासाठीची मुदत व्हॉट्स ऍपनं वाढवली आहे. ही मुदत ८ फेब्रुवारीला संपेल. मात्र आता भारत सरकारनं थेट व्हॉट्स ऍपच्या सीईओंना पत्र लिहिलं आहे. गोपनीयतेच्या धोरणातील नवे बदल मागे घ्या, अशी स्पष्ट मागणी पत्रातून करण्यात आली आहे. सर्वेक्षणाचा कौल : १८ टक्केच भारतीय व्हॉट्सॲपसाठी अनुकूलव्हॉट्स ऍप करू पाहत असलेल्या बदलांमुळे भारतीय नागरिकांची गोपनीयता धोक्यात येईल. त्यामुळे नागरिकांच्या माहितीची गोपनीयता जपण्यासाठी, निवडीचं स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी प्रस्तावित बदल मागे घ्या, अशी मागणी केंद्र सरकारनं केली आहे. भारतीयांचा योग्य आदर व्हायला हवा. व्हॉट्स ऍपकडून गोपनीयतेच्या धोरणात एकतर्फी करण्यात आलेले बदल स्वीकारार्ह नसतील, असं केंद्रानं सीईओ कॅथकार्ट यांना सुनावलं आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप