सर्वेक्षणाचा कौल : १८ टक्केच भारतीय व्हॉट्सॲपसाठी अनुकूल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 02:58 AM2021-01-19T02:58:07+5:302021-01-19T06:58:50+5:30

व्हॉट्सॲपच्या धोरणबदलासंदर्भात लोकल सर्कल्स या समाजमाध्यमी मंचाने अलीकडेच एक सर्वेक्षण केले. त्यात ८ हजार ९७७ नागरिकांची मते जाणून घेण्यात आली.

Poll: Only 18% of Indians are in favor of WhatsApp | सर्वेक्षणाचा कौल : १८ टक्केच भारतीय व्हॉट्सॲपसाठी अनुकूल

सर्वेक्षणाचा कौल : १८ टक्केच भारतीय व्हॉट्सॲपसाठी अनुकूल

Next

नवी दिल्ली : व्यक्तिगततेच्या मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या व्हॉट्सॲपच्या नवीन धोरणावरून वापरकर्त्यांमध्ये विविध मतमतांतरे असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी व्हॉट्सॲपला सोडून अन्य संदेशवहन मंचांचा वापर करण्याचे निश्चित केले आहे, तर फार थोड्या लोकांनी व्हॉट्सॲपशीच एकनिष्ठ राहण्याचे मतप्रदर्शन केले आहे.



व्हॉट्सॲपच्या धोरणबदलासंदर्भात लोकल सर्कल्स या समाजमाध्यमी मंचाने अलीकडेच एक सर्वेक्षण केले. त्यात ८ हजार ९७७ नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. २४४ जिल्ह्यांतून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून २४ हजार प्रतिसाद मिळाले. त्यानुसार तयार करण्यात आलेला अहवाल पुढीलप्रमाणे आहे.

Web Title: Poll: Only 18% of Indians are in favor of WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.