शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: 'केंद्राकडे धादांत खोटं आणि फालतू घोषणा देणारं सर्वात कुशल मंत्रालय', राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 12:33 IST

कोरोना महामारीच्या नियोजनाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस सातत्यानं केंद्रावर हल्ला चढवत आहे. कोरोना लसीच्या कमतरतेपासून रुग्णालयात रुग्णांना बेड न मिळण्यापासून अनेक गोष्टींवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

कोरोना महामारीच्या नियोजनाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस सातत्यानं केंद्रावर हल्ला चढवत आहे. कोरोना लसीच्या कमतरतेपासून रुग्णालयात रुग्णांना बेड न मिळण्यापासून अनेक गोष्टींवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

राहुल गांधी ट्विटर हँडलवरुन सातत्यानं मोदी सरकारवर टिकास्त्र सोडताना दिसत आहेत. राहुल यांनी यावेळी नेटिझन्सलाच प्रश्न विचारुन त्याचं उत्तर देखील स्वत:च देऊन टाकलं आहे. "केंद्र सरकारमधील सर्वात कुशल मंत्रालय कोणतं?", असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आणि त्याच्या उत्तरात मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "धादांत खोटं आणि फालतूच्या घोषणा करणारं गुप्त मंत्रालय हे केंद्राचं सर्वात कुशल मंत्रालय आहे", असा खोचक टोला राहुल यांनी लगावला आहे. 

कोरोना मृत्यूंचे आकडे लपविल्याचा केला आरोपराहुल गांधी यांनी याआधी केंद्र सरकारवर देशातील कोरोना मृत्यूंचे आकडे लपविल्याचा गंभीर आरोप केला आहे. याशिवाय देशातील प्रत्येक नागरिकानं आता मोफत लस मिळविण्याच्या मागणीसाठी पुढे यायला हवं असं म्हटलं होतं. देशातील प्रत्येक नागरिकाला लस देणं केंद्र सरकारचं कर्तव्य आहे, ज्यांच्याकडे इंटरनेट नाही त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. "कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन महत्वाचं नाही. लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला लस मिळायला हवी. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही, ज्यांच्याकडे इंटरनेट नाही. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस