शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कर्मचार्‍यांना यावर्षी दोनदा द्यावे लागेल संपत्तीचे विवरण नियम बंधनकारक : लोकपाल कायद्याचा परिणाम

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

नवी दिल्ली : लोकपाल कायद्याची अंमलबजावणी पाहता सर्व केंद्रीय कर्मचार्‍यांना यावर्षी आपली संपत्ती आणि त्यावरील कर्जासंबंधी विवरण (प्रॉपर्टी रिटर्न्स) दोनदा सादर करावे लागेल.

नवी दिल्ली : लोकपाल कायद्याची अंमलबजावणी पाहता सर्व केंद्रीय कर्मचार्‍यांना यावर्षी आपली संपत्ती आणि त्यावरील कर्जासंबंधी विवरण (प्रॉपर्टी रिटर्न्स) दोनदा सादर करावे लागेल.
१ ऑगस्ट २०१४ पर्यंत असलेल्या संपत्तीचे पहिले विवरण यावर्षी ३० एप्रिलपर्यंत सादर करण्याचा आदेश कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) जारी केला आहे. या कायद्यानुसार यावर्षी ३१ मार्च २०१५ रोजी संपणार्‍या आर्थिक वर्षासाठीचे दुसरे वार्षिक विवरण यावर्षी ३१ जुलैपूर्वी सादर करणे बंधनकारक राहील. लोकपाल कायद्यानुसार सादर केल्या जाणार्‍या प्रतिज्ञापत्राव्यतिरिक्त कर्मचार्‍यांना सध्या सेवा नियमानुसार स्थावर मालमत्तेसंबंधी विवरण (आयपीआर) द्यावे लागणार आहे. डीओपीटीने सर्व कर्मचार्‍यांना आयपीआर देणे बंधनकारक केले आहे. केंद्रीय मुलकी सेवा कायदा १९६४ नुसार सध्याच्या सेवा नियमानुसार ३१ डिसेंबर २०१४ संपणार्‍या वर्षाचे वार्षिक आयपीआर ३१ जानेवारी २०१५ पूर्वी सादर करावे लागेल. सर्व कर्मचार्‍यांनी आयपीआर तसेच लोकपाल कायद्यानुसार विवरण भरावे, असे सचिवालयाने सर्व मंत्रालय आणि विभागांना दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
----------------
ऑनलाईन सुविधा
आयएएस अधिकार्‍यांसाठी ऑनलाईन संपत्तीचे विवरण भरण्याची सुविधा एनआयसीने विकसित केली असून डीओपीटीने त्याबात आदेश जारी केला आहे. ग्रुप ए, बी, सी श्रेणीतील कर्मचार्‍यांना नव्या नियमानुसार प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे. चालू आर्थिक वर्षात विवरण भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१४ ही होती. त्यानंतर डिसेंबरपर्यंत आणि आता ३० एप्रिल २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.