शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

सेन्ट्रल डेस्क.... मी कुठलाही गुन्हा केला नाही, मी गुन्हेगार नाही! देवायानी खोब्रागडे यांनी दिले स्पष्टीकरण

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

अकोला : मोलकरीणला चुकीची वागणूक देणे किंवा पासपोर्ट घोटाळा करणे, असे आरोप माझ्यावर केले जात आहेत. त्या अनुषंगाने मला गुन्हेगाराच्या चौकटीत उभे करण्यात आले; परंतु मी कुठलाही गुन्हा केला नाही, त्यामुळे मी गुन्हेगार नाही, असे स्पष्टीकरण अमेरिकेतील भारतीय दूतावासातील माजी वरिष्ठ अधिकारी व परराष्ट्र मंत्रालयातील संचालक देवयानी खोब्रागडे यांनी शनिवारी अकोल्यात पत्रकारांशी बोलताना दिले.

अकोला : मोलकरीणला चुकीची वागणूक देणे किंवा पासपोर्ट घोटाळा करणे, असे आरोप माझ्यावर केले जात आहेत. त्या अनुषंगाने मला गुन्हेगाराच्या चौकटीत उभे करण्यात आले; परंतु मी कुठलाही गुन्हा केला नाही, त्यामुळे मी गुन्हेगार नाही, असे स्पष्टीकरण अमेरिकेतील भारतीय दूतावासातील माजी वरिष्ठ अधिकारी व परराष्ट्र मंत्रालयातील संचालक देवयानी खोब्रागडे यांनी शनिवारी अकोल्यात पत्रकारांशी बोलताना दिले.
स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता देवयानी खोब्रागडे शनिवार अकोल्यात आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी आपली बाजू मांडली. माझ्यावर ज्या मोलकरणीवर अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे, तिला मुळात अमेरिकेत स्थायिक व्हायचे होते आणि त्यातूनच तिने सगळे कुभांड रचले. पासपोर्टसंदर्भात घोळ केल्याचा आरोप केला जातो; परंतु माझ्या मुलींना त्या सज्ञान होईपर्यंत दुहेरी नागरिकत्व मिळते. त्यामुळे मी त्यांना अमेरिकेत घेऊन जाऊ इच्छित होते. पुढे त्या सज्ञान झाल्यावर त्यांना कुठल्याही एका देशाचे नागरिकत्व स्वीकारण्याची मुभा आहे. यात घोळ करण्या सारखे काहीही नाही, असे खोब्रागडे यांनी सांगितले.
विदेशात भारतीय अधिकारी-कर्मचार्‍यांना चांगली वागणूक दिली जात नाही म्हणून ते भारतात परत येत आहेत का, असे विचारले असता तसे काही नाही. अनेक लोक भारतीय संस्कृतीचे आकर्षण असल्यामुळे परत येतात. आपल्या देशात येऊन आपले सामाजिक दायित्व पार पाडण्याचा ते प्रयत्न करतात. गुणवत्ता असलेले अधिकारी-कर्मचारी जर परत येत असतील तर त्यात वाईट काहीही नाही, उलट ते देशाच्या भल्याचेच आहे, असे खोब्रागडे यांनी सांगितले. भारत सरकारने नवीन पिढी सक्षम होण्यासाठी काय करायला हवे असे विचारले असता, खोब्रागडे यांनी कौशल्य विकासाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपल्याला पदावरून हटविण्यात आले आहे, यावर आता आपली काय भूमिका असणार आहे, असे विचारल्यावर त्यांनी मला भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. माझ्यावर अन्याय झाल्यास मी नक्कीच न्याय मागेल असे सांगितले.
आदर्श प्रकरणात आपले व आपले वडील उत्तमराव खोब्रागडे यांचे नाव आले त्याबद्दल विचारले असता देवयानी यांनी आदर्श प्रकरणाची चौकशी सीबीआयने बंद केली आहे. माझा किंवा माझ्या वडिलांचा कुठलाही फ्लॅट आदर्शमध्ये नाही. मुंबईत सोसायटीत आमची मेंबरशिप आहे, ओनरशिप नाही, असे खोब्रागडे यांनी सांगितले. भविष्यात राजकारणात प्रवेश कराल का, असे विचारले असता त्यांनी असा कुठलाच विचार नाही. मला विदेश सेवेतच रुची आहे, असे त्यांनी सांगितले.

फोटो:देवयानी खोब्रागडे यांचा फाईल फोटो घ्यावा..
।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।