पनवेलमध्ये होळी व धूलिवंदन उत्साहात साजरे

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:23+5:302015-03-06T23:07:23+5:30

पनवेल : पनवेल शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात होळी व धूलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी पारंपरिकरीत्या होळी व धुळवड साजरी करण्यात आली. पनवेलमध्ये १५० वर्षांची परंपरा असलेली लाइन आळीमधील होळी पनवेलमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

Celebrating Holi and Dhulvandan in panvel | पनवेलमध्ये होळी व धूलिवंदन उत्साहात साजरे

पनवेलमध्ये होळी व धूलिवंदन उत्साहात साजरे

वेल : पनवेल शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात होळी व धूलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी पारंपरिकरीत्या होळी व धुळवड साजरी करण्यात आली. पनवेलमध्ये १५० वर्षांची परंपरा असलेली लाइन आळीमधील होळी पनवेलमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
तालुक्यातील गावांमध्ये देखील रात्री ढोल - ताशांच्या गजरात पारंपरिकरीत्या गुरुवारी होळीचे दहन करण्यात आले. शहरामधील प्रत्येक सोसायटीने देखील आपल्या सोसायटीसमोर होळी दहन केली. नवीन पनवेलमध्ये हिंदू सेवा समिती व अयप्पा सेवा संघ व जय अंबे ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अंबा माता मंदिर परिसरात दक्षिण भारतीय पद्धतीने पोंगल सण साजरा केला. २०० पेक्षा जास्त महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. तर धूलिवंदनाच्या दिवशी देखील शहरात मोठ्या उत्साहात रंगांची उधळण करण्यात आली. यामध्ये तरुणाईचा पुढाकार होता. शहरालगतचे हॉटेल, रिसॉर्टमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी डीजे, तसेच होळीच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते.
खारघर, कळंबोली, तळोजा, पनवेल शहर परिसरात मद्यपींनी धिंगाणा घातल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Celebrating Holi and Dhulvandan in panvel