शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयच्या धाडी अन् राज्यपालांची हुकूमशाही

By admin | Updated: December 16, 2015 03:54 IST

मुख्यमंत्री केजरीवालांचे प्रधान सचिव राजेंद्रकुमारांचे दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर सीबीआयचे धाडसत्र, अरूणाचल प्रदेशात सरकारला विश्वासात न घेता राज्यपालांतर्फे परस्पर

नवी दिल्ली : मुख्यमंत्री केजरीवालांचे प्रधान सचिव राजेंद्रकुमारांचे दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर सीबीआयचे धाडसत्र, अरूणाचल प्रदेशात सरकारला विश्वासात न घेता राज्यपालांतर्फे परस्पर विधानसभा सत्राचे आयोजन आणि पंजाबमधील दलित अत्याचाराचा मुद्दा या तीन कारणांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेससह तमाम विरोधकांनी सरकारला मंगळवारी अक्षरश: धारेवर धरीत गोंधळ घातला. दिल्लीतल्या धाडसत्राबद्दल अर्थमंत्री जेटलींनी खुलासा केला मात्र विरोधकांना तो अजिबात पटला नाही. जेटलींच्या खुलाशाचे केजरीवालांनी त्वरित खंडन करताच संसदेतले वातावरण आणखी तापले. अखेर दुपारी ३ वाजता राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.सकाळी राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, अरूणाचल प्रदेशच्या राज्यपालांनी परस्पर विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. राज्यपालांच्या मदतीने विधानसभा अध्यक्षांविरूध्द अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यासाठी भाजपने घोडेबाजार मांडला आहे. त्यावर अर्थमंत्री जेटली म्हणाले, विधानसभेच्या कार्यवाहीची चर्चा राज्यसभेत करता येत नाही. वादावर पडदा टाकतांना उपसभापती कुरियन म्हणाले, सभागृहात राज्यपालांविरूध्द चर्चा करण्यासाठी विशेष प्रस्ताव आणावा लागतो. हा प्रस्ताव तसा नसल्याने मला तो फेटाळावाच लागेल.सीबीआयने दिल्ली सरकारच्या प्रधान सचिवाच्या कार्यालयावर धाडी घातल्याचा विषयही संसदेच्या उभय सभागृहात दणाणला. राज्यसभेत डेरेक ओ ब्रायन म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर धाड ही आधुनिक भारतातली अभूतपूर्व घटना आहे. या आश्चर्यकारक प्रकाराने संघराज्य प्रणालीलाच आव्हान दिले आहे. सदर घटनेचा खुलासा करतांना संसदेतअर्थमंत्री जेटली म्हणाले, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यालय अथवा दिल्ली सरकारचा या धाडींशी अर्थाअर्थी संबंध नाही. प्रकरण जुने आहे. प्रधान सचिव राजेंद्रकुमार पूर्वीच्या सरकारमधेही महत्वाच्या पदावर होते. २00७ ते २0१४ या काळात एका विशिष्ठ कंपनीलाच कंत्राटे देण्याच्या प्रकरणात राजेंद्रकुमारांच्या कार्यालयावर सीबीआयने धाड घातली. जेटलींच्या खुलाशाचे केजरीवालांनी त्वरित खंडन केल्याची बातमी समजताच संसदेतले वातावरण अधिकच तापले. राज्यसभेचे कामकाज त्यात दिवसभरासाठी तहकूब झाले.(विशेष प्रतिनिधी)