सीबीआय स्वायत्त नाहीच

By Admin | Updated: June 16, 2014 03:39 IST2014-06-16T03:39:27+5:302014-06-16T03:39:27+5:30

दीर्घ काळापासून प्रतीक्षा असलेली स्वायत्तता सीबीआयला दिली जाणार नसल्याचे कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी स्पष्ट केले.

CBI is not autonomous | सीबीआय स्वायत्त नाहीच

सीबीआय स्वायत्त नाहीच

नवीन सिन्हा, नवी दिल्ली
दीर्घ काळापासून प्रतीक्षा असलेली स्वायत्तता सीबीआयला दिली जाणार नसल्याचे कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी स्पष्ट केले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांशी प्रथमच संवाद साधताना त्यांनी या मुद्याला हात घातला. संवेदनशील आणि सार्वजनिक हिताच्या प्रकरणांच्या तपासाला अकारण विलंब का होत आहे, असा सवालही त्यांनी केला.
सीबीआयला स्वायत्तता देण्याऐवजी अधिक कार्यक्षम, आर्थिकदृष्ट्या बळकट तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिक अधिकार देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. सर्व उपमहानिरीक्षक आणि वरिष्ठ पदांची नियुक्ती करताना सीबीआयच्या संचालकांचे मत विचारात घेतले जाईल. तपासाला गती देण्यासाठी मंत्रालय अन्य नियुक्त्यांनाही गती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संरक्षण मंत्रालयासंबंधी प्रकरणांच्या तपासाला गती दिली जावी, असेही ते म्हणाले.

Web Title: CBI is not autonomous