शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयच्या ४० ठिकाणी धाडी

By admin | Updated: September 25, 2015 00:33 IST

मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळा प्रकरणाच्या तपासाला वेग देत केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) गुरुवारी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील सुमारे ४० ठिकाणी धाडी घातल्या

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळा प्रकरणाच्या तपासाला वेग देत केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) गुरुवारी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील सुमारे ४० ठिकाणी धाडी घातल्या. यात या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार जगदीश सागर आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांचे माजी ओएसडी धनराज यादव राहात असलेल्या परिसरांचीही झाडझडती घेण्यात आली.सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भोपाळ, इंदूर, उज्जैन, रिवा, जबलपूर, लखनौ आणि अलाहाबादसह अनेक शहरांमध्ये शोध मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई एखाद्या ठराविक प्रकरणाशी संबंधित नव्हती तर परीक्षांच्या आयोजनात झालेल्या गैरव्यवहाराच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी होती. धनराज यादव याच्या लखनौमधील निवासस्थानाशिवाय जगदीश सागर, मध्य प्रदेशचे माजी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा, भरत मिश्रा, विनोद भंडारी, सुधीर शर्मा, ओमप्रकाश शर्मा, नितीन महिंद्रा व इतर काहींच्या परिसरात या धाडी घालण्यात आल्या. सीबीआयच्या पथकाने व्यापमं कार्यालयाचीही झडती घेतली. सीबीआयने व्यापमं घोटाळ्याशी संबंधित १०५ च्या वर गुन्हे नोंदविले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)सर्वोच्च न्यायालयाने तपास संस्थेला व्यापमं घोटाळ्यातील सर्व प्रकरणांचा तपास आपल्या हाती घेण्याचे निर्देश दिले होते. (वृत्तसंस्था)