ऑक्सिजन सिलेंडरसह कोरोनाग्रस्त वडीलांना घेऊन फिरत राहिला मुलगा, शेवटी बेड मिळालाच नाही मग... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 04:57 PM2021-04-15T16:57:05+5:302021-04-15T17:08:09+5:30

७० वर्षांच्या कोरोनाबाधित रुग्णाला  रुग्णालयात बेड मिळवून देण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना खूप कष्ट घ्यावे लागले आहेत. पण तरिही त्यांना बेड मिळालेला नाही. शेवटी त्यांना  रुग्णालयात दाखल न होताच घरी परतावं लागलं.

Carrying oxygen cylinder around 70 year old covid patient fails to find hospital bed lucknow uttar pradesh | ऑक्सिजन सिलेंडरसह कोरोनाग्रस्त वडीलांना घेऊन फिरत राहिला मुलगा, शेवटी बेड मिळालाच नाही मग... 

ऑक्सिजन सिलेंडरसह कोरोनाग्रस्त वडीलांना घेऊन फिरत राहिला मुलगा, शेवटी बेड मिळालाच नाही मग... 

googlenewsNext

कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. मोठया संख्येनं  समोर येत असलेल्या कोरोबाधितांच्या आणि मृतांच्या संख्येमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान एक धक्कादायक घटना समोर येत आहे.   ७० वर्षांच्या कोरोनाबाधित रुग्णाला  रुग्णालयात बेड मिळवून देण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना खूप कष्ट घ्यावे लागले आहेत. पण तरिही त्यांना बेड मिळालेला नाही. शेवटी त्यांना  रुग्णालयात दाखल न होताच घरी परतावं लागलं.

समोर आलेल्या माहितीनुसार लखनऊच्या अलीगंजमधील रहिवासी असलेले सुशील कुमार श्रीवास्तव रक्तदाबाचे रुग्ण होते.  बुधवारी अचानक त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना विवेकानंद  रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयात कोरोनाची चाचणी न करताच डॉक्टरांनी त्यांना परत पाठवले. त्याचवेळी ऑक्सिजन लेव्हल कमी होत होती, तरिही डॉक्टर तयार झाले नाहीत.  त्यानंतर टु नेट मशिनच्या माध्यमातून त्यांची चाचणी करण्यात आली. त्यात ते कोविड पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं. 

रुग्णालयातील लोकांनी  बेड नसल्याचं सांगत या वृद्धाला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या मुलानं ऑक्सिजन सिलेंडरसह वडिलांना  गाडीत बसवत रुग्णालयात बेड मिळवण्यसाठी शोधाशोध सुरू केली. यादरम्यान अनेक डॉक्टरांशी फोनवरून बोलण्याचाही प्रयत्न केला पण कोणीही प्रतिसाद दिला नाही. याच धावपळीच या वयस्कर व्यक्तीचा ऑक्सिजन सिलेंडरही संपायला आला होता. त्यानंतर तालकटोरा येथील ऑक्सिजन सेंटरमध्ये पैसे खर्च करून ऑक्सिजनक सिलेंडर विकत घेण्यात आला.  

एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!

कोरोनाबाधित वृद्धाचा मुलगा आशिष श्रीवास्तवनं सांगितले की, ''बुधवारी संध्याकाळी माझ्या वडिलांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यावेळी रेग्लूटर चेकअप करण्यासाठी मी त्यांना  विवेकानंद रुग्णालयात घेऊन आलो. त्यावेळी डॉक्टरांनी कोरोनाची चाचणी न करताच तपासण्यास नकार दिला. त्यानंतर नेट टू मशीनच्या माध्यमातून माझ्या वडीलांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचं कळाले. त्याचवेळी त्यांचे ऑक्सिजन सिलेंडरही संपायला आला होता. कोणतीही मदत न मिळाल्यामुळे बाजारातून दुसरा सिलेंडर विकत घ्यावा लागला.''

बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा.....

पुढे त्यांनी सांगितले की, डॉक्टरांना अनेकदा विनंती करूनही त्यांनी काहीही ऐकले नाही. बेड उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना अखेर घरी आणण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिल्यामुळे संपूर्ण कुटुंबात निराशा पसरली आहे.'
   

Web Title: Carrying oxygen cylinder around 70 year old covid patient fails to find hospital bed lucknow uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.