शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कॉल ड्रॉपसाठीची भरपाई रद्द : १०० कोटी ग्राहकांना कोर्टाचा दणका

By admin | Updated: May 12, 2016 04:41 IST

ग्राहकास भरपाई देण्यासंबंधीचा ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने (ट्राय) केलेला नियम सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केल्याने मोबाइल कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला.

नवी दिल्ली : मोबाइल फोनवरून केलेला फोन लागल्यानंतर तो मध्येच ‘ड्रॉप’ झाल्यास ग्राहकास भरपाई देण्यासंबंधीचा ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने (ट्राय) केलेला नियम सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केल्याने मोबाइल कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला.प्रत्येक ‘ड्रॉप कॉल’साठी एक रुपया व दिवसाला प्रत्येक ग्राहकास कमाल तीन रुपये या दराने भरपाई देण्याची सक्ती करणारा नियम ‘ट्राय’ने यंदाच्या १ जानेवारीपासून लागू केला होता. ‘ट्राय’चा हा नियम ‘अवाजवी, मनमानी आणि अपारदर्शी’ ठरवून सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला. परिणामी, देशभरातील सुमारे १०० कोटी मोबाइल ग्राहकांना मध्येच ‘ड्रॉप’ होणाऱ्या कॉलबद्दल तुटपुंजी का होईना, पण भरपाई मिळण्याचा मार्ग बंद झाला.‘सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडिया’ (सीओएआय) ही मोबाईल कंपन्यांची संघटना आणि २१ मोबाईल कंपन्यांनी ‘ट्राय’च्या या नियमास आधी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु तेथे याचिका फेटाळल्या गेल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपिले केली होती. न्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठाने ही अपिले मंजूर करून ‘ट्राय’या नियम रद्द केला. ‘ट्राय’ने असा नियम करण्याऐवजी केंद्र सरकारने ‘कॉल ड्रॉप’च्या संदर्भात अमेरिकेच्या धर्तीवर कायदा करावा, असेही न्यायालयाने सुचविले.आम्ही आमची यंत्रणा व तंत्रज्ञान सुधारण्यासाठी मोठी गुंतवणूक केली तरी आमच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या अनेक कारणांमुळे ग्राहकाने लावलेला प्रत्येक कॉल पूर्ण करणे प्रत्येक वेळी शक्य होतेच असे नाही. खास करून विविध नागरी संघटना व स्थानिक नगरपालिकांच्या आक्षेप/ विरोधामुळे पुरेशा संख्येने मोबाईल टॉवर उभारणे शक्य होत नाही. हे ‘कॉल ड्रॉप’चे एक प्रमुख कारण आहे, असे मोबाईल कंपन्यांचे म्हणणे होते. ‘कॉल ड्रॉप’ पूर्णपणे रोखणे आमच्या आवाक्याबाहेरचे असूनही त्यासाठी भरपाई द्यायला लावली तर आमच्यावर वर्षाला ५४ हजार कोटी रुपयांचा नाहक बोजा पडेल, असा मोबाईल कंपन्यांचा दावा होता.अपिलांवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करणे शक्य आहे का, असे विचारले असता ‘ट्राय’ने असे सुचविले होते की, मोबाईल कंपन्या प्रत्येक ‘ड्रॉप कॉल’साठी कोणत्याही पूर्वअटीशिवाय ग्राहकास एक ‘फ्री कॉल’ देण्यास तयार असतील, तर रोख स्वरूपात भरपाई देण्याचा आदेश मागे घेतला जाऊ शकेल. परंतु कंपन्यांनी हा प्रस्ताव मान्य केला नव्हता.(लोकमत न्यूज नेटवर्क)