गोव्यातून हल्ल्याचा बनावट कॉल

By Admin | Updated: January 22, 2015 01:24 IST2015-01-22T01:24:08+5:302015-01-22T01:24:08+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यक्रमात घातपाताचा अतिरेक्यांचा डाव असल्याचा बनावट फोन कॉल दिल्ली पोलिसांनी केल्याचे उघड झाले आहे.

Call of attack fake from Goa | गोव्यातून हल्ल्याचा बनावट कॉल

गोव्यातून हल्ल्याचा बनावट कॉल

मडगाव/पणजी : २६ जानेवारीच्या संचलनाला (परेडला) मुकल्यामुळे कुंकळ्ळी येथील १९ वर्षीय एनसीसीच्या विद्यार्थ्याने थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यक्रमात घातपाताचा अतिरेक्यांचा डाव असल्याचा बनावट फोन कॉल दिल्ली पोलिसांनी केल्याचे उघड झाले आहे.
नॅश स्टीव्ह कुतिन्हो असे या तरुणाचे नाव असून त्याला कुंकळ्ळी पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

Web Title: Call of attack fake from Goa