शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पामुळे ग्रामीण विकासाला मिळणार चालना!

By admin | Updated: March 1, 2015 02:08 IST

गरीब आणि वंचित घटकांसाठी अर्थसंकल्पात काही योजनांत तरतूद करण्यात आली आहे.

प्रत्येक गावात रुग्णालय उभारणी । संचार नेटवर्कने जोडणार । गावांमध्ये ४ कोटी घरांची उभारणीनवी दिल्ली : गरीब आणि वंचित घटकांसाठी अर्थसंकल्पात काही योजनांत तरतूद करण्यात आली आहे. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात मध्यान्ह भोजनसह शिक्षण क्षेत्रासाठी ६८,९६८ कोटी, तर मनरेगासह ग्रामीण विकासाशी संबंधित कार्यक्रमांसाठी ७९,५२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे जेटली यांनी सांगितले. गृहबांधणी आणि शहरी विकासासाठी २२,४०७ कोटी रुपये व बाल विकासासाठी १०,३५१ कोटी रुपये प्रदान करण्यात आले आहेत.सर्वांना छत्र उपलब्ध करून देण्याच्या योजनेंतर्गत शहरी भागात दोन कोटी तर ग्रामीण भागात चार कोटी घरांची उभारणी केली जाणार आहे. या घरांमध्ये २४ तास वीजपुरवठा, पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय व्यवस्था आणि रस्ते जोडणी या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. २०२० पर्यंत उर्वरित २० हजार गावांचे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल. यासाठी सौरऊर्जेची मदत घेतली जाणार आहे. सर्व गावांमध्ये वैद्यकीय सेवा, प्रत्येक मुलाला पाच किलोमीटर क्षेत्रात माध्यमिक शाळा उपलब्ध करून देणे यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातून शहरांकडे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठीही सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. रुर्बन क्लस्टर योजनेच्या माध्यमातून जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)मनरेगासाठी विक्रमी तरतूद महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगासाठी आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याचे जेटली म्हणाले. २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी मनरेगासाठीची ५,००० कोटींंची अतिरिक्त तरतूद केली. अर्थसंकल्पात सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी योजना आगामी काळातही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुणीही रोजगाराशिवाय राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही जेटलींनी दिली. मनरेगासाठी ३४,६९९ कोटी निधीचे पहिल्या टप्प्यात वाटप केले जाईल. मनरेगांतर्गत होणाऱ्या कामांची गुणवत्ता आणि प्रभाव यात सुधारणेवर सरकार भर देणार आहे.