शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

Budget 2018; तीन वर्षांमध्ये मनरेगाच्या निधीत रालोआ सरकारने घातली भर, यंदा किती निधी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 11:54 AM

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या सलग दोन अर्थसंकल्पांमध्ये मनरेगाच्या निधीत वाढ केल्याचे दिसून येते. या 1 फेब्रुवारीला मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पामध्येही असाच वाढीव निधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ठळक मुद्दे017-18 या आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मनरेगाला 48 हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता तर त्यामागच्या आर्थिक वर्षासाठी तो 38 हजार 500 कोटी इतका होता. ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन सिंग यांनी संपुआ सरकार सत्तेत असताना मनरेगाची स्थिती अत्यंत दयनीय होती अशी 2016 साली टीका केली होती.

नवी दिल्ली- संपुआ सरकारने सुरु केलेली मनरेगा योजनेचा फायदा निवडणूक प्रचारांमध्ये करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला असला तरी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने त्यासाठी सर्वाधिक निधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या सलग दोन अर्थसंकल्पांमध्ये मनरेगाच्या निधीत वाढ केल्याचे दिसून येते. या 1 फेब्रुवारीला मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पामध्येही असाच वाढीव निधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रालोआ सरकार केंद्रात सत्तेत आल्यावर काँग्रेसने लागू केलेल्या योजना रद्द होतील अशी चर्चा काही राजकीय नेते आणि तज्ज्ञ करत होते. यामध्ये मनरेगाचाही समावेश होणार असेही बोलले जात होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लोकसभेत या चर्चांना उत्तर दिले होते. ''मनरेगा हे काँग्रेसच्या अपयशाचे जिवंत स्मारक आहे. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनंतरही लोकांना खड्डे काढायच्या कामावर तुम्ही पाठवलंत. 'हे जे तुम्ही खड्डे काढत आहात हे त्या 70 वर्षांतील पापांमुळेच आहे' हे मी लोकांना सांगत राहाणार'' अशी शब्दांमध्ये मोदी यांनी या योजनेचा आणि त्यावर चाललेल्या चर्चांचा समाचार घेतला होता. ही योजना बंद होणार नाही मात्र त्याच्या निधीमध्ये आपण वाढ करु असे त्यांनी सांगितले होते. याबरोबरच मनरेगासारख्या योजना याआधीही केंद्रात विविध स्वरुपात आणि विविध घटकराज्यांमध्ये सुरु होत्या याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.

2017-18 या आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मनरेगाला 48 हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता तर त्यामागच्या आर्थिक वर्षासाठी तो 38 हजार 500 कोटी इतका होता. त्या आर्थिक वर्षामध्ये सरकारने 47 हजार कोटी मनरेगासाठी खर्च केल्याचेही अरुण जेटली यांनी सांगितले होते. मनरेगाला मिळालेला सर्वाधीक निधी रालोआ सरकारने दिला हे नमूद करायलाही अर्थमंत्री विसरले नव्हते. केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन सिंग यांनी संपुआ सरकार सत्तेत असताना मनरेगाची स्थिती अत्यंत दयनीय होती अशी 2016 साली टीका केली होती.

गेल्या बजेटमध्ये मनरेगासंबंधी मांडण्यात आलेले काही महत्त्वाचे मुद्दे

2019 पर्यंत 50 हजार ग्रामपंचायती गरिबीमुक्त करणार मनरेगाच्या माध्यमातून यंदा 5 लाख तलाव बांधण्याचे लक्ष्य बेघर आणि कच्च्या घरांत राहणा-यासाठी 2019 पर्यंत 1 कोटी घरे बांधणारपंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूदपंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूददीनदयाल ग्राम ज्योती योजनेसाठी 4818 कोटींची तरतूद2018  पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचणारग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे 2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवली

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Arun Jaitleyअरूण जेटलीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस