नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार, सिनेमात कामाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावले आणि लुटली अब्रू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 10:09 IST2023-07-21T10:08:53+5:302023-07-21T10:09:18+5:30

Crime News: या अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवरील एका फ्रेंडने सिनेमात कामासाठी मुलाखत घेण्याच्या बहाण्याने तिला हॉटेलमध्ये बोलावले. त्यानंतर तिच्यावर हॉटेलमधील रुममध्ये बलात्कार केला.

Budding Bhojpuri actress raped, called to a hotel on the pretext of film work and robbed Abru | नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार, सिनेमात कामाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावले आणि लुटली अब्रू 

नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार, सिनेमात कामाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावले आणि लुटली अब्रू 

दिल्लीशेजारील गुरुग्राम येथे एका २४ वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या एका इन्स्टाग्रामवरील फ्रेंडने सिनेमात कामासाठी मुलाखत घेण्याच्या बहाण्याने तिला हॉटेलमध्ये बोलावले. त्यानंतर तिच्यावर हॉटेलमधील रुममध्ये बलात्कार केला. पीडित तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितले की, ती भोजपुरी कलाकार आहे. तसेच ती सध्या दिल्लीमध्ये राहते.

पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणीचे इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत. तिथे ती नियमितपणे आपले व्हिडीओ पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी ती इन्स्टाग्रामवरून महेश पांडे नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली. त्याने तिला भोजपुरी चित्रपटात काम देण्याची ऑफर दिली. तसेच २९ जून रोजी त्याने तिला मुलाखतीसाठी गुरुग्राममधील उद्योगविहार परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावले.

पीडित महिलेने आरोप केला की, जेव्हा मी हॉटेलमध्ये पोहोचले, तेव्हा महेश याने आधीच तिथे एक खोली बुक करून ठेवली होती. तो मला तिथे घेऊन गेला. तसेच काही प्रश्न विचारल्यानंतर मद्यपान करू लागला. त्यानंतर जेव्हा मी तिथून जाऊ लागले, तेव्हा त्याने माझ्यावर बळजबरी करून बलात्कार केला.

पीडितेने पुढे सांगितले की, बलात्कार केल्यानंतर आरोपीने मला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच आपल्या काही मित्रांकरवी मला फोन केला. तसेच माझे काही खासगी व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट करण्याची धमकी दिली.दरम्यान, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भादंविमधील विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपांची शहानिशा होत असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.  

Web Title: Budding Bhojpuri actress raped, called to a hotel on the pretext of film work and robbed Abru