शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास पोरी! जखमी झाली तरी नेटाने लढली, 15 वर्षीय मुलीने चोरांना चांगलीच अद्दल घडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 12:43 IST

चोरट्यांशी लढतानाची  संपुर्ण घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच सोशल मीडियावरही याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

चंदीगड - चोरीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक घटना पंजाबच्या जालंधरमध्ये घडली आहे. एका 15 वर्षीय मुलीच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या चोरांना मुलीने चांगलीच अद्दल घडवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुसुम कुमारी असं या धाडसी मुलीचं नाव असून ती रस्ताने जात असताना बाईकवरून आलेल्या दोन चोरांनी तिचा मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. 

कुसुमने न घाबरता चोरांना विरोध केला. मात्र मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांनी या दरम्यान तिच्या हातावर वार केले. पण तरीदेखील मुलीने त्यांचा पाठलाग करणं सुरूच ठेवलं. ती यामध्ये जखमी झाली पण नेटाने लढल्याची माहिती मिळत आहे. चोरट्यांशी लढतानाची  संपूर्ण घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच सोशल मीडियावरही याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

मोबाईल हिसकावणाऱ्या चोराला कुसुमने जोरदार विरोध केला. तसेच त्यांची बाईकही पकडली त्यावेळी एक जण बाईकवरून खाली उतरला आणि त्याने कुसुमला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिचे केस धरले. तिच्यावर शस्त्राने वारही केले. मात्र कुसुम मागे हटली नाही. तिने जखमी अवस्थेत पुन्हा चोरांचा पाठलाग केला आणि मदतीसाठी जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. कुसुमचा आवाज ऐकून काही लोक तिच्या मदतीसाठी धावून आले.  

चोर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यातील एकाला पकडण्यात यश आलं आहे. कुसुमने आपला मोबाईलही परत मिळवला आणि तिच्या या हिमतीमुळे एका चोराला देखील अटक झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे. अविनाश कुमार असं या चोराचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. चोरट्यांशी लढताना कुसुमला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

कडक सॅल्यूट! 25 किमी तब्बल 8 तास पायी प्रवास करून ITBP जवानांनी कुटुंबीयांपर्यंत पोहोचवला मृतदेह

'मी राष्ट्रवादीचा आमदार' असं म्हणत रोहित पवारांनी केला 'या' संघटनेला विरोध

एकापेक्षा जास्त बँक खाती असणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण

CoronaVirus News : चिंता वाढली! लक्षणं नसलेल्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

CoronaVirus News : कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, म्हणाले...

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMobileमोबाइल