...म्हणून त्याने विमानात बॉम्ब असल्याची पसरवली अफवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 14:22 IST2020-02-04T14:11:42+5:302020-02-04T14:22:33+5:30

Indigo Airlines : बॉम्ब असल्याचा फोन येताच विमानतळावर एकच खळबळ उडाली.

bomb rumour in indigo airlines so mother dont miss the flight | ...म्हणून त्याने विमानात बॉम्ब असल्याची पसरवली अफवा

...म्हणून त्याने विमानात बॉम्ब असल्याची पसरवली अफवा

नवी दिल्ली -  प्रवास करताना वेळ पाळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. उशीर झाल्यामुळे अनेकदा खूप जणांची ट्रेन, बस जाते अथवा विमान सुटतं. मात्र आपल्या आईला विमानतळावर पोहोचण्यास उशीर होईल म्हणून एका तरुणाने चक्क विमानात बॉम्ब आहे अशी अफवा पसरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉम्ब असल्याचा फोन येताच विमानतळावर एकच खळबळ उडाली. मात्र तपासानंतर ही एक अफवा असल्याचं समोर आलं आहे. 

एका तरुणाने एअरलाईन्सच्या कस्टमर केअरवर फोन करून विमानात बॉम्ब असल्याचं सांगितलं. तरुणाच्या आईला विमान प्रवास करायचा होता. मात्र काही कारणांमुळे त्यांना विमानतळावर पोहचण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे विमान सुटण्याची शक्यता होती. मात्र आईचं विमान सुटू नये यासाठी तरुणाने विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवली. त्याने फोनकरून विमानतळावर याची माहिती दिली. त्यामुळे विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र त्यामध्ये काहीच संशयास्पद आढळून आले नाही. 

विमानात बॉम्ब न आढल्यामुळे याप्रकरणी त्या फोनसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (3 फेब्रुवारी) संध्याकाळी 7.38 वाजता इंडिगो एअरलाईन्सच्या कस्टमर केअरवर एक फोन आला ज्यामध्ये मुंबईला जाणाऱ्या 6E-843 विमानात बॉम्ब असून ते विमान टी-1 वरून उड्डाण करणार असल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी एजन्सीच्या मदतीने तपासणी केली असता बॉम्ब अथवा इतर काही संशयास्पद आढळले नाही. सर्व गोष्टी ठीक होत्या. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

तपासादरम्यान दोन महिलांना त्या विमानाने प्रवास करायचा होता. मात्र त्या उशिराने आल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्या महिलांकडे याबाबत चौकशी केली असता त्यांना याबाबतच काहीच माहीत नव्हते. मात्र एका महिलेने तिच्या मुलाला विमानतळावर पोहोचण्यासाठी उशीर होणार असल्याचं सांगितलं होतं. तेव्हा त्याने आईला चिंता करू नको असं काही होणार नाही, मी काहीतरी करतो असं सांगितलं. पुढे अधिक तपास केला असता आईचं विमान सुटू नये यासाठी मुलानेच खोटा फोन करून विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवल्याची माहिती मिळाली. 

महत्त्वाच्या बातम्या 

Opinion Poll : दिल्लीत केजरीवालांचाच बोलबाला, आप उडवणार भाजपची दाणादाण 

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करण्याबाबत गृहमंत्रालयाने लोकसभेत केली मोठी घोषणा

Delhi Election 2020 : अर्ध्याहून अधिक उमेदवार फक्त बारावी पास, 16 अशिक्षित

प्राध्यापिकेला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटविले; महाराष्ट्र हळहळला, सर्वत्र संतापाची भावना

महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येणार की नाही?; उद्धव ठाकरे म्हणतात...

 

Web Title: bomb rumour in indigo airlines so mother dont miss the flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.