महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येणार की नाही?; उद्धव ठाकरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 09:42 AM2020-02-04T09:42:30+5:302020-02-04T10:02:33+5:30

उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनवरून भाजपावर निशाणा साधला आहे. 

maharashtra cm uddhav thackeray slams bjp on bullet train | महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येणार की नाही?; उद्धव ठाकरे म्हणतात...

महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येणार की नाही?; उद्धव ठाकरे म्हणतात...

Next

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीच्या माध्यमातून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पालाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने आधीपासूनच या प्रकल्पाला विरोध केला होता. उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनवरूनभाजपावर निशाणा साधला आहे. 

'बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, त्याच्यामुळे इथे किती उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे आणि तो जर उपयोगाचा असेल… तर पटवून द्या' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सरकार स्थापन होण्याआधी जे पाच वर्षे सरकार होतं त्यांनी अनेक असे प्रकल्प निर्माण केले, मंजूर केले, उभे केले, जे पांढऱ्या हत्तीसारखे नंतर समोर आले आणि आपण त्यांना स्थगिती दिली. त्यातला एक बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे. बुलेट ट्रेन महाराष्ट्रात येणार की नाही? असा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर दिले आहे. 

मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

'सरकारचं काम विकास करणं आहे. बरोबर आहे…अलीकडेच मी मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. कामे सुरू आहेत हेही खरं आहे की. काही प्रकल्पांना मी स्थगिती दिली आहे… जरूर दिली आहे. मला नेहमी असं वाटतं की, पैशाचा जो मघाशी विषय निघाला त्या आर्थिक परिस्थितीकडे बघून राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवली पाहिजे. आताच्या आता काय ताबडतोबीने गरजेचे आहे. नुसतं आपल्याला कोण बिनव्याजी म्हणा.. किंवा कमी दराने कर्ज देतोय म्हणून ते अंगावरती घ्यायचं आणि गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी पण काढायच्या… पुन्हा हे जे पांढरे हत्ती आहेत ते पोसायचे, हे काही योग्य नाही' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

...तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो, उद्धव ठाकरेंचे विधान 

मुख्यमंत्र्यांनी 'बुलेट ट्रेनबद्दलसुद्धा मला असं वाटतं की याच्यावरती सगळय़ांच्या सोबत बसून विचार व्हायला पाहिजे. बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, त्याच्यामुळे इथे किती उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे आणि तो जर उपयोगाचा असेल… तर पटवून द्या. आपण जनतेसमोर जाऊ. मग पाहू काय करायचे ते' असं देखील म्हटलं आहे. सामनाला दिलेल्या मुलाखतीत सरकार स्थापनेच्या घडामोडीपासून वादग्रस्त नागरिकता कायद्यापर्यंत, राहुल गांधींपासून अजित पवारांपर्यंत प्रत्येक प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी उत्तरं दिली आहेत. 

आमची हातमिळवणी खुपते, पण पक्ष फोडून आलेले चालतात; भाजपाला उद्धव ठाकरेंचा टोला

उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीच्या माध्यमातून मराठवाडाच्यापाणी प्रश्नावर भाष्य केलं आहे. मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य प्रचंड आहे. मध्यंतरी तर लातूरला ट्रेननं पाणी द्यावं लागलं होतं. त्यामुळे पाण्याचे जे काही प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी मी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मराठवाड्या पाणीप्रश्न महत्त्वाचा आहे. काय करणार त्याचं? असा सवाल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी विचारला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "मराठवाड्याच्या बैठकांमध्ये हा पाण्याचा प्रश्न नक्कीच समोर आला आहे. खूपच मोठा प्रश्न आहे. मराठवाडा हा गेली काही वर्षे सतत दुष्काळात आहे. पाण्याचं दुर्भिक्ष्य प्रचंड आहे. मध्ये तर लातूरला ट्रेनने पाणी द्यावं लागलं होतं. तर त्यासाठी पाण्याचे जे काही प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत. म्हणून मी पंकजाला एक पत्र लिहिलं आहे की, तू हा जो मुद्दा काढला आहेस, ऐरणीवर आणला आहेस…धन्यवाद! पण त्याबद्दल सरकार संवेदनशील तर आहेच; पण हा प्रश्न पंकजाने मांडण्याच्या आधीच मी मार्गी लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत."

महत्त्वाच्या बातम्या 

जवानांना आवश्‍यकतेनुसार जेवण, कपडे मिळत नाहीत; कॅगचा ठपका!

प्राध्यापिकेला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटविले; महाराष्ट्र हळहळला, सर्वत्र संतापाची भावना

Corona Virus: कोरोना व्हायरसप्रकरणी राज्यात सहा जण निरीक्षणाखाली; ८३ रुग्णांची दूरध्वनीद्वारे विचारपूस

China Coronavirus : चीनमधील मृतांची संख्या ३६१; आतापर्यंत १७,२०५ लोकांना संसर्ग

 

Web Title: maharashtra cm uddhav thackeray slams bjp on bullet train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.