हत्या की आत्महत्या? पुण्यापाठोपाठ 'या' शहरात 6 जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 11:45 AM2020-06-19T11:45:54+5:302020-06-19T11:51:43+5:30

पुण्यापाठोपाठ आणखी एका शहरात 6 जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

bodies of 6 members of same family recovered in ahmedabad | हत्या की आत्महत्या? पुण्यापाठोपाठ 'या' शहरात 6 जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

हत्या की आत्महत्या? पुण्यापाठोपाठ 'या' शहरात 6 जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

Next

अहमदाबाद - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. परिस्थितीला कंटाळून पुण्यामध्ये एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. पुण्यापाठोपाठ आणखी एका शहरात 6 जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत. 

सहा जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहे. ही नेमकी हत्या आहे की आत्महत्या याचा शोध घेण्यात येत आहे. सहा जणांमध्ये चार मुलांचे मृतदेह आहेत. पोलिसांनी सर्व  मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. 4 मुलांची हत्या करून दोघांनी स्वत:ला संपवलं असावं अशी शंका व्यक्त केली जात आहे. तर ही आत्महत्या असल्याचा दावा वडिलांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पुण्यात सुखसागरनगर भागात राहणाऱ्या एका कुटुंबाने गुरुवारी रात्री  उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दाम्पत्याने घराच्या भिंतीवर कारण लिहून ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 'कृपया पोलिसांनी कोणालाही त्रास देऊ नये. आम्ही आमच्या मर्जीने परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवित आहोत' असे भिंतीवर लिहिलेले आढळले. त्याखाली पती पत्नीची सही आढळून आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या

खतरनाक! डोंगराच्या टोकावर उभं राहून त्याने मारली बॅक फ्लिप अन्...; Video जोरदार व्हायरल

CoronaVirus News : धडकी भरवणारी आकडेवारी! देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक

"पंडित नेहरूंना दोष देणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!"

ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला; सरकारसह खासगी क्षेत्रालाही फटका

Sushant Singh Rajput Suicide: 'सच्चा मित्र गमावला', सुशांतच्या निधनाने इस्रायल झालं भावूक

CoronaVirus News : लढ्याला यश! औषध किंवा लस नाही तर आता 'या' थेरेपीने होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार?

CoronaVirus News : 'त्याच्या' जिद्दीला सलाम! आईचं औषध अन् भावंडांच्या शिक्षणासाठी उचलतोय कोरोनाग्रस्तांचे मृतदेह

Web Title: bodies of 6 members of same family recovered in ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.