CoronaVirus News : 'त्याच्या' जिद्दीला सलाम! आईचं औषध अन् भावंडांच्या शिक्षणासाठी उचलतोय कोरोनाग्रस्तांचे मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 11:04 AM2020-06-18T11:04:22+5:302020-06-18T11:20:12+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे काहींची नोकरी गेली आहे. तर अनेक कुटुंबाबर बिकट परिस्थिती ओढावली आहे. सीलामपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. 

CoronaVirus Marathi News student handles bodies covid 19 patients mothers medicines | CoronaVirus News : 'त्याच्या' जिद्दीला सलाम! आईचं औषध अन् भावंडांच्या शिक्षणासाठी उचलतोय कोरोनाग्रस्तांचे मृतदेह

CoronaVirus News : 'त्याच्या' जिद्दीला सलाम! आईचं औषध अन् भावंडांच्या शिक्षणासाठी उचलतोय कोरोनाग्रस्तांचे मृतदेह

Next

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या साडे तीन लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे  तब्बल 12000 नवे रुग्ण आढळले आहेत. याच दरम्यान अनेक घटना समोर येत आहे. लॉकडाऊनमुळे काहींची नोकरी गेली आहे. तर अनेक कुटुंबाबर बिकट परिस्थिती ओढावली आहे. सीलामपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. 

लॉकडाऊन आधी सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण लॉकडाऊननंतर सर्वच बदललं. मोठ्या भावाची नोकरी गेली. घरी आईच्या उपचारासाठी पैसे नसल्याने एका मुलाला रुग्णालयात कोरोनाग्रस्तांचे मृतदेह उचलण्याचे काम करावे लागत आहेत. चांद मोहम्मद असं या मुलाचं नाव असून तो बारावीचा विद्यार्थी आहे. आईच्या औषधोपचारासाठी आणि भावंडांच्या शाळेची फी भरण्यासाठी चांद रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांचे मृतदेह उचलत आहे. चांदच्या आईला थायरॉईडचा आजार आहे पण कुटुंबाकडे उपचाराकरिता पैसे नाहीत. त्याचा मोठा भाऊ कृष्णा नगर बाजारात दुकानात काम करून घर चालवत होता. 

भावाची नोकरी गेल्यानंतर शेजाऱ्यांकडून मिळणार रेशन आणि छोटी-मोठी नोकरी करून कुटुंब चालत होते. अशा परिस्थितीत चांदला रुग्णालयात साफसफाईचे काम मिळाले. त्यामुळे तो दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत कोरोना रुग्णांचे मृतदेह उचलण्याचं काम करतो. या कामामुळे कोरोनाचे संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे. मात्र नोकरीची देखील गरज असल्याचं त्याने म्हटलं आहे. तसेच त्याच्या कुटुंबात तीन बहिणी, दोन भाऊ आणि आई-वडील आहेत. यावेळेस आम्हाला अन्न आणि आईच्या औषधांची गरज आहे. 

बहिणी शाळेत शिकत आहे. शाळेची फी भरणे शक्य झालेले नाही. पैशांची गरज आहे. चांदच्या पगारामुळे कुटुंबाची परिस्थिती सुधारेल अशी त्याला आशा आहे. त्याला या धोकादायक कामासाठी त्याला 17 हजार रुपये मिळत असल्याचं देखील त्याने सांगितलं. इतर कर्मचाऱ्यांसह तो दोन किंवा तीन मृतदेह उचलतो. मृतदेहांना रुग्णवाहिकेत ठेवतो आणि स्मशानभूमीत घेऊन जातो. हे सर्व काम त्याला पीपीई कीट घालून करावे लागते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका! सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

CoronaVirus News : बापरे! 'या' व्यक्तींसाठी कोरोना ठरतोय जीवघेणा; 12 पट अधिक आहे मृत्यूचा धोका

CoronaVirus News : तंत्रज्ञानाची किमया! रुग्णाजवळ न जाताच 'हे' भन्नाट उपकरण कोरोना योद्ध्यांना माहिती देणार

एकीकडे चीन तर दुसरीकडे कोरोना; मोदी सरकारसमोर आहेत 'ही' 5 मोठी आव्हानं

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय; आता देशात दररोज तब्बल 3 लाख लोकांची होणार चाचणी

India China Faceoff: "लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहिदांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत"

Web Title: CoronaVirus Marathi News student handles bodies covid 19 patients mothers medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.