CoronaVirus News : बापरे! 'या' व्यक्तींसाठी कोरोना ठरतोय जीवघेणा; 12 पट अधिक आहे मृत्यूचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 08:45 AM2020-06-18T08:45:06+5:302020-06-18T09:00:39+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्याना अनेक गोष्टी समोर येत आहेत. एका रिसर्चमधून एक महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.

देशभरामध्ये मंगळवारी कोरोनाच्या संसर्गामुळे 2003 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे कोरोनामुळे तब्बल11 हजारांहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येने देशात साडेतीन लाखांचा आकडा पार केला. दररोज दहा हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय केले जात आहेत.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्याना अनेक गोष्टी समोर येत आहेत. एका रिसर्चमधून एक महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.

काही व्यक्तींसाठी कोरोना जीवघेणा ठरत आहेत. त्यांना मृत्यूचा धोका हा 12 पट अधिक असल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने याबाबत रिसर्च केला आहे.

रिपोर्टनुसार, उत्तम आरोग्य असलेल्या लोकांच्या तुलनेत हृदयरोग आणि मधुमेह सारखा आजार असलेल्या व्यक्तींसाठी कोरोना व्हायरस घातक आहे. त्यांच्या मृत्यूची शक्यता 12 पट जास्त असते.

निरोगी व्यक्तीपेक्षा कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर अशा व्यक्ती रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता अधिक आहे. अमेरिकेत 22 जानेवारी ते 30 मे या कालावधीत 13 लाख लोकांचा अभ्यास करण्यात आला.

उत्तम आरोग्य असलेल्या व्यक्तींना कोरोना व्हायरसचा धोका हा 1.6 टक्के आहे. तर इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना त्यांचा धोका हा 19.5 टक्के असल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे.

गंभीर आजार आणि मृत्यूची शक्यता वयानुसार वाढते. महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका हा अधिक आहे. जगभरात जवळपास 20 टक्के लोकांना काही ना काही आजार आहेच.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेले 51.2% रुग्ण हे साठ वर्षांच्या वरील आहेत. रिसर्चमधून ही माहिती मिळत आहे.

उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी, हृदयाशी संबंधित आजार असल्यास कोरोनाचा धोका हा सर्वाधिक आहे. या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

भारतात जवळपास 54.6 कोटी लोकांना ह्रदयाशी संबंधित आजार आहे. तर तब्बल 70 कोटी लोकांना मधुमेह आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशामध्ये दीड लाख कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर 1 लाख 86 हजार 934 रुग्ण घरी परतले आहेत. कोरोना साथीमुळे आजारी असणाऱ्यांपेक्षा बरे होऊन जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.